भगवान शुक्र नियमितपणे त्यांची राशी बदलत असतात. या राशी गोचरचा सर्व राशींना वेगळ्या प्रकारे प्रभावित करते. आता एक वर्षानंतर शुक्र आपल्या मूळ राशीत परत येईल. १७ सप्टेंबरपासून पितृ पक्ष साजरा होत आहे. १५ दिवसांच्या पितृ पक्षात शुक्र ग्रह आपली राशी बदलत आहे. अनेक राशींसाठी हा काळ चांगला राहील. शुक्र हा धन, ऐश्वर्य, सुख आणि समृद्धीसाठी जबाबदार ग्रह मानला जातो. ते विशेषतः वृषभ आणि तूळ राशीचे स्वामी आहेत. तुमच्या कुंडलीत शुक्र कुठे आहे यावरही तुमच्यावरील शुक्राचा प्रभाव अवलंबून असतो. त्यामुळे अचूक परिणामांसाठी कुंडलीतील शुक्राचे स्थान जाणून घेतले पाहिजे. भाद्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी, १८ सप्टेंबर २०२४, बुधवारी,८:३० नंतर, शुक्र कन्या राशीतून आपल्या तूळ राशी प्रवेश करेल. आता शुक्र आपल्या राशीत प्रवेश करत असल्याने अनेक राशींसाठी विशेष लाभ होईल. जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी सप्टेंबरमध्ये शुक्राचे परिवर्तन विशेष असेल.
मालव्य राजयोग निर्माण होईल
१८ सप्टेंबर २०२४ रोजी तूळ राशीत शुक्राच्या गोचरमुळे मालव्य नावाचा राजयोग तयार होत आहे जो काही राशींना विशेष लाभदायक ठरेल.
हेही वाचा – शुक्र करणार कन्या राशीत प्रवेश! नीचभंग राजयोगामुळे उजळू शकते ‘या’ राशींचे भाग्य
या राशींना फायदा होईल
शुक्राच्या राशी बदलामुळे एक किंवा दोन नव्हे तर १० राशींना फायदा होईल. शुक्र गोचरच्या काळात मेष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ राशीच्या लोकांना फायदा होईल. शुक्र या राशींना धनलाभ देईल. या राशीच्या जीवनसाथीशी संबंधित समस्या दूर होतील आणि काही लोकांचे लग्न होण्याची शक्यता आहे. अनेक राशींना फक्त गुंतवणुकीचा फायदा होईल. जिथून तुम्ही आशा सोडली होती अशा अनेक ठिकाणाहून पैसे येतील . याशिवाय तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धीही येईल. या राशीच्या लोकांनी पितृ पक्षाच्या काळात नवीन करार करणे काही काळासाठी पुढे ढकला.
© IE Online Media Services (P) Ltd