Weekly Horoscope 6 To 12 October 2025 ” ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा ग्रह-नक्षत्रांच्या बदलामुळे अत्यंत खास ठरणार आहे. या आठवड्यात शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार असून आधीच सूर्य तेथे विराजमान आहे. परिणामी सूर्य-शुक्र युतीमुळे शुक्रादित्य राजयोग निर्माण होणार आहे. याशिवाय, मंगल आणि बुध तुला राशीत, राहु कुंभ राशीत, गुरु मिथुन राशीत, केतु सिंह राशीत तर शनि मीन राशीत वक्री अवस्थेत असतील.
अशा ग्रहस्थितीमुळे या आठवड्यात काही राशींवर नवपंचम, षडाष्टक, त्रिएकादश व केंद्र योग यांचा प्रभाव पडणार असून धनलाभ, संधी आणि शुभवार्ता मिळण्याचे योग दिसत आहेत.
मेष (Aries Weekly Horoscope)
ऊर्जा आणि नव्या संधी लाभतील. नोकरीत बदल इच्छिणाऱ्यांना संधी मिळेल. आर्थिक स्थैर्य राहील, मात्र खर्चही वाढतील. कुटुंबात सौहार्द, प्रेमसंबंध गोड राहतील. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ (Taurus Weekly Horoscope)
कुटुंबाहबरोबर वेळ घालवाल. घरात शुभकार्य होईल. नोकरीत बढती किंवा व्यापारात भागीदारीतून लाभ होईल. आर्थिक स्थिती संतोषजनक असेल. वैवाहिक जीवन गोड असेल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनतीची गरज आहे
मिथुन (Gemini Weekly Horoscope)
कार्यक्षेत्रात व्यस्तता वाढेल. तुमच्या सर्जनशीलतेची दखल घेतली जाईल. मात्र रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासातून लाभ संभवतो. स्पर्धा परीक्षार्थींना यशाची शक्यता. प्रेमजीवनात चढउतार राहतील.
कर्क (Cancer Weekly Horoscope)
कुटुंबात स्नेह टिकून राहील. कामात मेहनतीनंतर यश लाभेल. आर्थिक स्थितीत सुधारणा. पोटाच्या तक्रारी उद्भवू शकतात. वैवाहिक जीवन गोड राहील.
सिंह (Leo Weekly Horoscope)
नेतृत्वगुण उभरून येतील. कामात नवी जबाबदारी मिळेल व यशही लाभेल. गुंतवणुकीसाठी चांगला काळ. मुलांकडून शुभवार्ता. प्रेमजीवन व विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल.
कन्या (Virgo Weekly Horoscope)
आत्मचिंतन व योजनांच्या अंमलबजावणीचा काळ. नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना संधी. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक. कुटुंबात किरकोळ मतभेद. प्रेमात किरकोळ तणाव. आरोग्य सामान्य.
तूळ (Libra Weekly Horoscope)
आत्मविश्वास व वर्तनकुशलतेने लोकांचे मन जिंकाल. कामात नवे प्रकल्प हाती येतील. व्यापार्यांना नफा. आर्थिक स्थिती मजबूत होईल. विवाह प्रस्ताव संभवतात.
वृश्चिक (Scorpio Weekly Horoscope)
उतार-चढावाचा आठवडा. कामात काही अडथळे येतील पण धैर्याने त्यावर मात होईल. खर्च वाढेल. कुटुंबातील आरोग्याच्या कारणाने चिंता. प्रेमजीवनातील गैरसमज दूर होतील.
धनु (Sagittarius Weekly Horoscope)
सामाजिक वर्तुळ वाढेल. वरिष्ठांचा सहकार्य मिळेल. गुंतवणुकीतून नफा. कुटुंबात शांती राहील, प्रेमसंबंध गोड होतील. अविवाहितांना शुभवार्ता मिळेल. प्रवास लाभदायी होईल.
मकर (Capricorn Weekly Horoscope)
मेहनत व संयमाची कसोटी असेल. कार्यक्षेत्रातील आव्हानांवर मात करून यश. आर्थिक स्थिती सामान्य. कुटुंबात वाद टाळा. आरोग्य सांभाळा. प्रेमजीवनात स्थैर्य.
कुंभ (Aquarius Weekly Horoscope)
नवे संधी मिळतील. कामात नवी जबाबदारी यशस्वीपणे निभवाल. व्यापारात भागीदारीतून लाभ. कुटुंबात आनंद व प्रेमजीवन गोड राहील.
मीन (Pisces Weekly Horoscope)
संतुलन व संयम गरजेचे. प्रयत्नांना यश. पदोन्नती किंवा नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता. आर्थिक लाभ विशेषतः गुंतवणुकीतून. प्रेमजीवन व कुटुंबात समाधान लाभेल.