Weekly Numerology Prediction 29 September To 5 October 2025: जन्मतारखेवरून ठरलेले मूलांक या आठवड्यात जीवनाच्या विविध पैलूंवर ठसा उमटवणार आहेत. बुध तूळ राशीत उदय होऊन वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. तसेच ३ ऑक्टोबर रोजी शनि पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार असून त्याचा थेट परिणाम राशी व मूलांकांवर दिसून येईल. या आठवड्यात काहींना संधी, काहींना प्रेमसंबंधात गोडवा तर काहींना व्यावसायिक बदलाचे संकेत मिळतील.

मूलांक १ (१, १०, १९, २८ जन्मतारीख असणारे) – (Mulank 1)

आपली विचारशक्ती तीव्र होईल. मानसिक व भावनिक नाते अधिक घट्ट होतील. तणाव कमी होईल. प्रेमसंबंध उजळतील, एखाद्या खास व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता.

मूलांक २ (२, ११, २०, २९जन्मतारीख असणारे) – (Mulank 2)

नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितींमुळे ताण जाणवेल. हळूहळू परिस्थिती सुधारेल. मित्रपरिवाराशी भेटीगाठी वाढतील. स्थिर आठवडा असेल.

मूलांक ३ (३, १२, २१,३० जन्मतारीख असणारे) – (Mulank 3)

आपला सकारात्मक दृष्टीकोन अडथळ्यांवर मात करेल. प्रभावशाली चर्चांमुळे नवे रहस्य उलगडतील. जुन्या व्यक्तीशी पुनर्भेट होऊ शकते. आठवडाअखेर व्यस्त राहील.

मूलांक ४ (४, १3, २२,३१जन्मतारीख असणारे) – ( Mulank 4)

कुटुंबाशी अपूर्ण वचन देऊ नका. नवी सुरुवात करण्याची संधी. शुक्र व मंगळाच्या कृपेने मनावरील ताण हलका होईल. चुका स्वीकारून पुढे जाण्याचा मार्ग सापडेल.

मूलांक ५ (५, १४, २३ जन्मतारीख असणारे) – (Mulank 5)

या आठवड्यात प्रसिद्धीवर लक्ष केंद्रीत राहील. निराशा टाळा. लहान प्रवास लाभदायी ठरेल. कुटुंबासह वेळ घालवा. कामात लक्ष विचलित होऊ देऊ नका.

मूलांक ६ (६, १५, २४ जन्मतारीख असणारे) – (Mulank 6)

करिअरशी संबंधित नवी संधी येईल. सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे न वाटली तरी दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. नवे मित्र लाभतील. सर्जनशीलतेने प्रभाव वाढेल.

मूलांक ७ (७, १६, २५ जन्मतारीख असणारे) (Mulank 7)

लोक तुमच्या अनुभवाने प्रभावित होतील. महिलांनी रागावर संयम ठेवावा. निर्णय घेण्यापूर्वी सल्लागारांशी चर्चा करा. संवाद कौशल्य उपयोगी पडेल.

मूलांक ८ (८, १७, २६ जन्मतारीख असणारे) (Mulank 8)

घरगुती वातावरण आनंदी राहील. जोडीदाराशी नाते गोड होईल. कार्यक्षेत्रात सावधगिरी गरजेची आहे, अन्यथा कोणी श्रेय घेऊ शकतो. गंभीर दृष्टिकोन ठेवा.

मूलांक ९ (९, १८, २७ जन्मतारीख असणारे) – (Mulank 9)

काही मित्र ईर्ष्या करू शकतात. व्यावसायिक क्षेत्रात आठवडा चांगला जाईल. विभाग बदलण्याची संधी येऊ शकते. पर्यायांचा विचार करा.