Mangal Gochar In Scorpio 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ऊर्जा, भाऊ, भूमी, शक्ती, धैर्य, पराक्रम, शौर्याचा कारक आहे. तसेच मंगळाला ग्रहांचा सेनापती मानले गेले आहे. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात मंगळाला विशेष स्थान आहे. सध्या मंगळ कर्क राशीत आहे आणि तो ऑक्टोबरमध्ये स्वत:च्या वृश्चिक राशीत प्रवेश करेल. ज्यामुळे काही राशींचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. यासह करिअर आणि व्यवसायात विकास साधता येतो. चला जाणून घेऊया कोणत्या भाग्यवान राशी आहेत…

तूळ राशी ( Libra Zodiac)

तूळ राशीच्या लोकांसाठी मंगळ राशीचा बदल सकारात्मक ठरू शकतो. कारण तुमच्या भाग्यशाली कुंडलीत हा राशी बदल होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल. यासह कामात भाग्याची साथ मिळेल. या काळात जीवनात सकारात्मक बदल येऊ शकतात. यासह करिअर क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे पदोन्नती होऊ शकते. व्यापारातही नफा होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. त्याच वेळी तुम्ही कोणत्याही धार्मिक मांगलिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)

मंगळाचे गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण मंगळ तुमच्या राशीतून लग्न भावात भ्रमण करत आहे. त्यामुळे यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच या काळात तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढतील. त्याचबरोबर दीर्घकाळापासूनचे काम करता येईल. कठोर परिश्रमाने यश मिळू शकते. त्यांचे आरोग्य चांगले राहील. यासह, अविवाहित लोकांसाठी वैवाहिक संबंध येऊ शकतात. त्याच वेळी, तुम्हाला आदर मिळू शकतो. नोकरदार लोकांची पद्दोन्नती होऊ शकते.

मीन राशी (Pisces Zodiac)

तुमच्यासाठी, मंगळ राशीतील बदल शुभ ठरू शकतो. कारण हे गोचर तुमच्या गोचर कुंडलीतील सुख-सुविधांवर परिणाम करणार आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. यासह तुम्हाला वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळेल. त्याचबरोबर तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांना नवीन करार किंवा भागीदारीचा प्रस्ताव मिळू शकतो, जो भविष्यात फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवनात बऱ्याच काळापासून सुरू असलेला वाद मिटू शकतो.