लक्झरी जर्मन कार निर्माता BMW कंपनीने गुरुवारी अधिकृतपणे X1 sDrive18i M Sport SUV भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केली आहे. BMW X1 SUV हे ब्रँडच्या वाहन लाइनअपमधील लोकप्रिय एंट्री-लेव्हल मॉडेल आहे. कंपनीने एक्स १ रेंजमध्ये आधीपासूनच लोकरीप्रिय असणाऱ्या M स्पोर्ट लाइनअपमध्ये पेट्रोल व्हेरिएंट समाविष्ट केले आहे. X1 sDrive18i M Sport नवीन काळातील अनेक फीचर्स असल्याने एक आनंददायी ड्रायव्हिंगचा अनुभव मिळतो.
बुकिंग आणि डिलिव्हरी
बीएमडब्ल्यू कंपनीने आपल्या X1 sDrive18i M Sport एसयूव्हीचे बुकिंग सुरु केले आहे. तुम्ही या एसयूव्हीचे बुकिंग अधिकृत बीएमडब्ल्यू डीलर्सकडे जाऊन किंवा ऑनलाईन करू शकता. या लेटेस्ट एसयूव्हीची डिलिव्हरी जून २०२३ पासून सुरु होणार आहे. चेन्नईतील बीएमडब्ल्यू ग्रुप प्लांटमध्ये या कारचे उत्पादन केले जाईल.
हेही वाचा : गौतम अदानींनी खरेदी केली ‘ही’ ७ सीटर SUV, करोडोंमध्ये आहे किंमत, फीचर्स पाहून व्हाल थक्क
कसे असणार डिझाईन ?
BMW X1 sDrive18i M Sport एसयूव्ही आधीच्या मॉडेलपेक्षा आकाराने मोठी आहे. त्याचे बाहेरील डिझाईन हे त्याचा प्रमुख किडनी ग्रिल आणि स्लिम एलईडी हेडलाइट्सद्वारे हायलाइट करण्यात आले आहे. तसेच यामध्ये हाय बीम असिस्टंसह डॉप्टिव्ह एलईडी हेडलाइट्सहा रिअर एलईडी टेललाईट्स देण्यात आले आहेत.
कंपनीच्या म्हणण्यानुसार ही एसयूव्ही कंपनीच्या हाय-परफॉर्मन्स मोटरस्पोर्ट जीन्सपासून प्रेरित आहे. ऑल न्यू एम स्पोर्ट व्हेरिएंटमध्ये एम-स्पेसिफिक फ्रंट आणि रिअर बंपर, M लेदर स्टीयरिंग व्हील, M अलॉय व्हील आणि स्पोर्टी इंटीरियरसह अनेक फीचर्स यामध्ये बघायला मिळतात. पुढील आणि मागील बंपर पॅनल्सला एम-स्पेसिफिक डिझाइन मिळते आणि ते काळ्या हाय-ग्लॉस इन्सर्टसह येतात.
कॉस्मेटिक बदलांव्यतिरिक्त या मॉडेलमध्ये काही नवीन फीचर्स देखील देण्यात आली आहेत. जसे की बीएमडब्ल्यू कनेक्टेड ड्राइव्हसह BMW कर्व्ह डिस्प्ले, हाय बीम असिस्टंटसह अडॅप्टिव्ह एलईडी हेडलाइट्सह अॅक्टिव्ह सीट्स, डिजिटल की प्लससह कम्फर्ट ऍक्सेस, हरमन कार्डन हाय-फाय सिस्टम आणि रिव्हर्सिंग असिस्टंट असे नवीन फीचर्स यामध्ये देण्यतात आले आहेत.
हेही वाचा : Cars with Airbag: ‘या’ आहेत सहा एअरबॅग्स असलेल्या कार्स, जाणून घ्या संपूर्ण यादी
इंजिन आणि स्पीड
बीएमडब्ल्ब्यूच्या या मॉडेलमध्ये काही अपडेटेड फीचर्सशिवाय हे रेग्युलर एक्स १ पेट्रोल सारखेच आहे. या मॉडेलचे इंजिन १३४ बीएचपी आणि २३० एनएम टॉर्क जनरेट करते. याशिवाय पॉवर आऊटपुटमध्ये बदल करण्यात आलेला नाही आहे. तसेच कारच्या ० ते १०० किमी प्रतितास इतकी वेळ आहे ती सुद्धा कायम राहिलेली आहे. रेग्युलर पेट्रोल व्हर्जन आणि M स्पोर्ट व्हर्जन दोन्ही ९.२ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास इतका वेग पकडतात.
किती आहे किंमत ?
लक्झरी जर्मन कार निर्माता BMW कंपनीने गुरुवारी अधिकृतपणे X1 sDrive18i M Sport SUV भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये X1 sDrive18i xLine या पेट्रोल व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत ही ४५,९०,००० रुपये इतकी आहे. तसेच BMW X1 sDrive18i M Sport या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ही ४८,९०,००० रुपये इतकी आहे.