Tata Nexon EV: भारतीय वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सकडे देशात सर्वात मोठा इलेक्ट्रिक वाहनांचा पोर्टफोलिओ आहे. टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलिओमध्ये नेक्सॉन ईव्ही प्राईम, नेक्सॉन ईव्ही मॅक्स आणि टिगॉर ईव्ही यांचा समावेश आहे. आता जर तुमचा देखील इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण टाटाची सर्वात जास्त लोकप्रिय इलेक्ट्रिक कार ‘Nexon EV MAX’ तुम्हाला स्वस्तात घेता येणार आहे. एका सोप्या फायनान्स प्लॅनद्वारे तुम्हाला ही कार स्वस्तात खरेदी करता येणार आहे. चला तर जाणून घेऊया Tata Nexon EV वरील फायनान्स प्लॅन.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Nexon EV MAX किंमत
Nexon EV MAX कारची सुरुवातीची किंमत १७.७४ लाख रुपये इतकी आहे. ही एक्स शोरूम किंमत आहे. इलेक्ट्रिक SUV ची ऑन-रोड (दिल्ली) किंमत रु. १८.६६ लाख पासून सुरू होते आणि रु. २०.२२ लाखांपर्यंत जाते. परंतु तुम्ही ही कार फायनान्स प्लॅनद्वारे फक्त १.७५ रुपयांच्या डाउन पेमेंटवर मिळवू शकता.

(हे ही वाचा : खुशखबर! Honda ची नंबर वन बाईक ११ हजारात होईल तुमची; महिन्याला भरा केवळ ‘इतका’ EMI )

Nexon EV MAX Finance Plan
तुमच्याकडे १.७५ रुपये असल्यास, ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, तुम्ही पाच वर्षांसाठी ९.८ टक्के दराने कर्ज घेतल्यास, ३५,७५४ रुपये मासिक EMI जमा करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला ही कार स्वस्तात खरेदी करता येणार आहे. या कारच्या प्रत्येक प्रकारासाठी तुम्हाला वेगळा डाउन पेमेंट आणि EMI जमा करावा लागेल.

Nexon EV MAX ‘अशी’ आहे खास

कंपनीने या कारमध्ये मोठी पॉवरफुल बॅटरी वापरली आहे. या बॅटरीच्या जोरावर नवीन नेक्सॉन ईव्ही मॅक्स युजर्सना ARAI सर्टीफाइड ४३७ किमीपर्यंतची रेंज देते. म्हणजेच एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही इलेक्ट्रिक कार न थांबता ४३७ किलोमीटरपर्यंत धावू शकेल. या कारच्या वेगाबद्दल बोलायचे झाले तर ही इलेक्ट्रिक कार केवळ ९ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास इतका वेग धारण करु शकते. या कारचा टॉप स्पीड १४० किलोमीटर प्रतितास इतका आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buy tatas new electric car nexon ev max with a range of 437 km on a single charge for just rs 1 75 lakh on down payment pdb