Datsun Redi Go Base Model: कार क्षेत्रातील सर्वात कमी बजेट आणि जास्त मायलेज देणारी कार हॅचबॅक सेगमेंटमध्ये आढळते, जो सर्वाधिक पसंतीचा सेगमेंट आहे. या सेगमेंटमध्ये उपलब्ध असलेल्या मायलेज कारच्या रेंजमध्ये, आम्ही ‘Datsun redi GO’ या कार बद्दल बोलत आहोत जी कमी बजेट आणि मोठी मायलेज देणारी कार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘Datsun redi GO’ किंमत
Datsun redi GO च्या बेस मॉडेलची किंमत ३,९७,८०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. ऑन-रोड, ही किंमत ४,३५,५५१ रुपये होते. Datsun Redi Go च्या ऑन-रोड किमतीनुसार, जर तुम्हाला ही कार कॅश पेमेंटद्वारे खरेदी करायची असेल, तर तुमच्याकडे ४.३६ लाख रुपये असणे आवश्यक आहे. पण येथे नमूद केलेला प्लॅन वाचल्यानंतर तुम्ही ही कार ४० हजार रुपये देऊन खरेदी करू शकता. Datsun Redi Go खरेदी करण्याची सोपी फायनान्स योजना आज आपण येथे जाणून घेऊया.

(हे ही वाचा : Sporty लूक असणारी कार हवी आहे? ‘या’ आहेत देशातील १० लाखांपेक्षा कमी किमतीतील कार )

Datsun redi GO फायनान्स योजना

ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, जर तुमच्याकडे ४०,००० रुपये असतील तर बँक या कारसाठी ३,९५,५५१ रुपये कर्ज देऊ शकते. बँक या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.८ टक्के दराने व्याज आकारेल.

Datsun Redi Go बेस मॉडेलवर कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला या कारच्या डाऊन पेमेंटसाठी ४०,००० रुपये जमा करावे लागतील आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पुढील पाच वर्षासाठी तुम्हाला दरमहा ८,३६५ रुपये मासिक EMI जमा भरावा लागतील.

Datsun Redi Go वर उपलब्ध ऑफरचे डिटेल्स जाणून घेतल्यानंतर तुम्हाला या कारच्या इंजिनपासून ते मायलेजपर्यंत संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

(हे ही वाचा : Car Finance Plan: फक्त ५२ हजारात घरी घेऊन जा टाटाची जबरदस्त मायलेजवाली ‘ही’ कार; एवढा बसेल EMI )

Datsun redi GO कार ‘अशी’ आहे खास

Datsun redi GO मध्ये ९९९ सीसी चे इंजिन देण्यात आले आहे, ते ०.८ लिटरचे पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ५४ PS पॉवर आणि ७२ Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही Datsun redi GO कार २२.० kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Datsun redi go base model is the second cheapest car in the country buy it with a down payment of 40 thousand know what is the plan pdb