Upcoming Mahindra Car: देशातील दिग्गज कार निर्माता कंपनी महिंद्रा ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि परवडेल अशा किमतीत अनेक नवनवीन कार बाजारात लाँच करत असते. तसेच, काही मॉडेल्स अपडेट करत असते. महिंद्रा कंपनीच्या कार जबदस्त फीचर्स, लूक, डिझाईनमुळे खूप पसंत केल्या जातात. आता देशांतर्गत ऑटोमोबाईल उत्पादक महिंद्रा आपली नवीन कार आणण्याच्या तयारीत आहे. ही कार बाजारात टाटाच्या पंचला टक्कर देईल, असे सांगितले जात आहे. चला या कारच्या सर्व वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया…
महिंद्राची नवी कार
या वर्षी महिंद्रा भारतात काही नवीन कार लाँच करण्याची तयारी करत आहे. ज्यामध्ये कंपनीची सर्वात स्वस्त एसयूव्ही देखील असेल, याशिवाय कंपनी थारची फेसलिफ्ट आणि XUV700 चे नवीन मॉडेल देखील लाँच करेल. आता बातमी येत आहे की, कंपनी त्यांच्या सर्वात लोकप्रिय SUV XUV 3XO चे इलेक्ट्रिक मॉडेल आणत आहे. १५ ऑगस्ट रोजी ही कार लाँच होणार असल्याचे वृत्त आहे. या नवीन मॉडेलची बऱ्याच काळापासून प्रतिक्षा केली जात होती. जर सूत्रांवर विश्वास ठेवला तर, ही महिंद्राची सर्वात स्वस्त एसयूव्ही असल्याचे सिद्ध होऊ शकते. सध्या, तुम्ही ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये खरेदी करू शकता. अलिकडेच राजकोट-अहमदाबादजवळ चाचणी दरम्यान XUV 3XO EV दिसली आहे. चाचणी दरम्यान ही कार यापूर्वीही अनेक वेळा पाहिले गेले आहे.
डिझाइनमध्ये बदल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन XUV 3XO EV च्या डिझाइनमध्ये काही बदल दिसून येतात. या EV चा पुढचा भाग गोल प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि C-आकाराच्या LED DRLs सह समान स्प्लिट हेडलॅम्प सेटअपसह दिसतो. या डिझाइनमध्ये काळ्या रंगाची रूफ रेल, ORVM आणि शार्क फिन अँटिना आहेत, याशिवाय त्यात ३६०-डिग्री कॅमेराची सुविधा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, XUV 3XO EV पूर्ण चार्ज केल्यावर ४०० किमीपर्यंतची रेंज देऊ शकते.
सुरक्षा वैशिष्ट्ये
नवीन XUV 3XO EV मध्ये अनेक चांगल्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश केला जाऊ शकतो. ईव्हीमध्ये वायरलेस अॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटोसह १०.२५ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाऊ शकते. यामध्ये ६ एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, डिस्क ब्रेक आणि ३ पॉइंट सीट बेल्ट सारखे फीचर्स दिसतील. नवीन XUV 3XO EV थेट पंच EV शी स्पर्धा करेल. भारतात या नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीची किंमत १२ ते १५ लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. परंतु, कंपनीकडून अद्याप या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण, लवकरच हे देखील उघड होईल.