सध्या मार्केटमध्ये Mahindra Thar ही XUV कार धुमाकूळ घालत आहे. Mahindra Thar ला टक्कर देण्यासाठी Maruti ने आपल्या ऑफ-रोड एसयूव्ही कारचे नवे व्हेरिएंट बाजारपेठेत नुकतेच लाँच केले होते. मारुतीची ही कार Zeta आणि Alpha या दोन ट्रिममध्ये ऑफर केली गेली होती. या नव्या व्हर्जनचे मायलेज १६.९४ किलोमीटर प्रति लिटर पर्यंत होते. ही ग्राहकांसाठी स्वस्त आवृत्ती होती. परंतु आता कंपनीने हे नवे एडिशन बंद केले असल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मारुती सुझुकीने त्यांच्या जिमनी ऑफ-रोडर एसयूव्हीचे थंडर एडिशन बंद केले आहे. कंपनीने ही आवृत्ती आपल्या वेबसाइटवरून काढून टाकली आहे. जिमनी थंडर एडिशन हा या एसयूव्हीचा सर्वात स्वस्त प्रकार होता जो कंपनीने १०.७४ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केला होता. डिसेंबर २०२३ मध्ये लाँच झालेली जिमनी थंडर एडिशन केवळ एका महिन्यासाठी ग्राहकांसाठी उपलब्ध होती. लुक आणि फिचर्स पाहता Jimny ची किंमत जास्त असल्यामुळे ग्राहकांचा याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मारुतीने Jimny Thunder Edition लाँच केले होते.

(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ ७ सीटर CNG कारसमोर सर्वांची बोलती बंद, 26kmpl पर्यंतचं मायलेज, किंमत फक्त… )

थंडर एडिशन बंद झाल्यानंतर आता जिमनीच्या रेग्युलर व्हेरिएंटची किंमत १२.७४ लाख रुपयांपासून सुरू होते आणि १५.०५ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. तथापि, मारुतीने या आवृत्तीच्या उर्वरित स्टॉकवर सवलत देणे सुरू ठेवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये निर्मित जिमनी थंडर एडिशन मॉडेलच्या सर्व प्रकारांवर ५ हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

जिम्नी थंडर एडिशन १.५ लिटर चार सिलेंडर के१५८ हायब्रिड पेट्रोल इंजिन देण्यात आले, जे १०५ एचपी आणि १३४ एनएम पॉवर जनरेट करते. जिमनी थंडर एडिशनच्या पॉवरट्रेन स्पेक्समध्ये कोणताही बदल झालेला नव्हता. ट्रान्स्मिशनमध्ये ५-स्पीड मॅन्युअल आणि ४-स्पीड टॉर्क कॉव्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय या इंजिनसह उपलब्ध करण्यात आले होते.

थंडर एडिशनमध्ये समाविष्ट मानक उपकरणांमध्ये फ्रंट स्किड प्लेट, साइड डोअर क्लेडिंग, डोअर व्हिझर, डोअर सिल गार्ड्स, ग्रिप कव्हर्स, फ्लोअर मॅट्स आणि रस्टिक टॅनमधील बाह्य ग्राफिक्स समाविष्ट होते. सुरक्षिततेच्या बाबतीत या कारमध्ये ६ एअरबॅग्ज, ब्रेक लिमिटेड स्लिप डिफरेंशियल, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, रियर व्ह्यू कॅमेरा, ब्रेक असिस्ट फंक्शन आणि इंजिन इमोबिलायझर यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti has silently pulled the plug on the jimny thunder edition which has been delisted from the companys website pdb