कार क्षेत्रातील मोठी मायलेज असलेल्या हॅचबॅक कार्सची प्रचंड मागणी असताना, आकर्षक डिझाइन आणि फिचर्ससह हॅचबॅक कारची मागणीही खूप जास्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्हालाही चांगल्या मायलेजसह स्टायलिश हॅचबॅक विकत घ्यायची असेल, तर या हॅचबॅक सेगमेंटच्या दोन लोकप्रिय कारचे संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या, ज्या कमी बजेटमध्ये तुम्ही खरेदी करू शकता.

या कारच्या तुलनेसाठी मारुती इग्निस आणि टाटा टियागो आहेत, ज्यामध्ये तुम्हाला या दोघांचे मायलेज, फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किमतीशी संबंधित प्रत्येक लहानातले लहान डिटेल्स आज आम्ही सांगणार आहोत.

आणखी वाचा : TVS Apache RR 310 Finance Plan: फक्त ३० हजारात सुपर स्पोर्ट्स बाईक घरी घेऊन जा, मिळेल फास्ट स्पीड आणि जबरदस्त स्टाईल

Maruti Ignis: मारुती इग्निस ही तिच्या कंपनीची लोकप्रिय आणि आकर्षक डिझाइन केलेली कार आहे आणि कंपनीने ती चार ट्रिमसह बाजारात आणली आहे.

मारुती इग्निसमध्ये 1197 cc चे 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 83 PS पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही मारुती इग्निस 20.89 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेच्या कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. सोबतच ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि रियर पार्किंग सेन्सर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. मारुती इग्निसची सुरुवातीची किंमत ३.३५ लाख रुपये आहे, जी टॉप व्हेरिएंटवर जाताना ७.७२ लाख रुपयांपर्यंत जाते.

आणखी वाचा : Top 3 Best CNG Cars India: स्टायलिश डिझाईन असलेल्या या टॉप ३ सीएनजी कार, उत्तम फिचर्स आणि मोठी मायलेज देतात

Tata Tiago: टाटा टियागो ही त्याच्या सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित कार आहे. टाटा मोटर्सने या कारचे सहा ट्रिम बाजारात आणले आहेत. कारच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने त्यात 1199 cc चे 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 86 PS पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

मायलेजबद्दल टाटा मोटर्सचा दावा आहे की ही हॅचबॅक 20.9 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. Tata Tiago ची सुरुवातीची किंमत ५.३८ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी टॉप व्हेरिएंटवर जाताना ७.८० लाखांपर्यंत जाते.

More Stories onऑटोAuto
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti ignis vs tata tiago which is better in price mileage features and style read compare report prp
First published on: 03-06-2022 at 18:14 IST