टू व्हीलर सेक्टरच्या बाईक सेगमेंटमध्ये एन्ट्री लेव्हल स्पोर्ट्स बाईक्सपासून ते महागड्या प्रीमियम बाईक्सपर्यंत स्पोर्ट्स बाईक्सची मोठी रेंज आहे. या सध्याच्या रेंजमध्ये आम्ही TVS Apache RR 310 बद्दल बोलत आहोत जी मिड रेंजमध्ये येणारी प्रीमियम स्पोर्ट्स बाईक आहे.

TVS Apache RR 310 ची सुरुवातीची किंमत २,६५,००० रुपयांपासून सुरू होते जी ऑन रोड २,९७,६९४ रुपयांपर्यंत जाते. तुम्हाला ही बाईक विकत घ्यायची असेल, तर आम्ही त्या फायनान्स प्लॅनचे डिटेल्स सांगत आहोत ज्यामध्ये तुम्ही ही बाईक सहज डाउन पेमेंट आणि EMI सह खरेदी करू शकाल.

Kia Sonet car Sale
बाकी कंपन्या फक्त पाहतच राहिल्या; कियाच्या ‘या’ ५ सीटर SUV कारची ४ लाखाहून अधिक युनिट्सची विक्री, किंमत…
Kavya Maran’s car collection
सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन सारखंच ग्लॅमरस आहे तिचं कार कलेक्शन; किंमत वाचून फुटेल घाम
Maruti Suzuki Grand Vitara Waiting Period
मारुतीच्या ‘या’ ५ सीटर कारसमोर Wagon R ही विसरुन जाल! खरेदीसाठी मोठी गर्दी; मायलेज २७ किमी, वेटिंग पीरियड पोहोचला…
Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी

ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही ही बाईक खरेदी केली तर बँक तुम्हाला यासाठी २,७६,९६४ रुपये कर्ज देईल. या कर्जानंतर, तुम्हाला किमान डाउन पेमेंट म्हणून ३०,००० रुपये जमा करावे लागतील. कर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दरमहा ८,१४४ रूपयांचा मासिक EMI भरावा लागेल.

TVS Apache RR 310 वर दिलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने ३ वर्षांची कालमर्यादा सेट केली आहे. या दरम्यान बँक दिलेल्या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.७ टक्के दराने व्याज आकारेल.

आणखी वाचा : Top 3 Best CNG Cars India: स्टायलिश डिझाईन असलेल्या या टॉप ३ सीएनजी कार, उत्तम फिचर्स आणि मोठी मायलेज देतात

फायनान्स प्लॅन अंतर्गत उपलब्ध कर्ज, डाउन पेमेंट आणि ईएमआयचे संपूर्ण डिटेल्स जाणून घेतल्यानंतर, आता तुम्हाला या बाईकचे इंजिन आणि स्पेसिफिकेशनचे संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या.

TVS Apache RR 310 च्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यात 312.2 cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन कमाल ३४ पीएस पॉवर आणि २७.३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ६ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने तिच्या पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक दिले आहेत, ज्यामध्ये ड्युअल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम बसवण्यात आले आहे.

मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही स्पोर्ट्स बाइक ३३.१ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

बाईकच्या फिचर्सबद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, चार रायडिंग मोड, नेव्हिगेशन, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ओडोमीटर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.