प्रचंड उष्णतेपासून आणि उकाड्यापासून आपले रक्षण करण्यासाठी आता पावसाचे आगमन झाले आहे. या वातावरणात, निसर्गाचे सौंदर्य लुटण्यासाठी अनेकजण सहलीला जाण्याचेदेखील नियोजन करतील. मात्र अशा पावसाळी वातावरणात वाहन प्रवासाचा कोणत्याही त्रासाशिवाय आनंद घेण्यासाठी तुमच्या गाडीत कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

पावसामुळे रस्त्यावर धुकं पसरणे, रस्ते निसरडे होणे, मुसळधार पाऊस पडून रस्ता पाहण्यास अडथळा येण्यासारखे अनेक त्रास उद्भवू शकतात. मात्र यंदाचा पावसाळा प्रत्यके वाहन चालकांसाठी सोयीचा होण्यासाठी गाडीमध्ये कोणती उपकरणे असणे आवश्यक आहेत पाहा.

विंडो व्हिझर [Window visor]

पावसाळ्यात गाडीच्या बाहेरील हवेचा आंनद घेण्यासाठी तुम्हाला वाहनाच्या काचा उघडण्याची कितीही इच्छा असली तरीही पावसाचे पाणी खिडकीतून आत येण्याच्या भीतीमुळे आपण काच बंद ठेवतो. थंड वातावरणामुळे बंद गाडीत एसीचा वापर न केल्यास गाडीत दमटपणा निर्माण होतो. ज्यामुळे गाडीच्या काचेवर धुकं तयार होतात. असे होऊ नये, आणि पाऊस असतानाही वाहनाच्या काचा उघड्या ठेवता याव्यात यासाठी, तुम्ही डोअर व्हिझर किंवा विंडो व्हिझरचा वापर करू शकता.

हेही वाचा : Monsoon car tips : पावसाळ्यात गाडीला गंज लागू नये, प्रवास सुरक्षित होण्यासाठी काय करावे? पाहा

फॉग लॅम्प [Fog lamp]

पावसाळी वातावरणात जोरदार पावसानंतर धुकं हे येताच. विशेषतः घाट परिसरात तुम्हाला धुक्याचा अनुभव अधिक येतो. त्यामुळे वाहनात फॉग लॅम्प लावून घेणे अतिशय महत्त्वाचे असते. अनेक नवी गाड्यांमध्ये हे उपकरण आधीच बसवलेले असते; मात्र जुन्या गाड्यांमध्ये हा लॅम्प नसल्यास तो बसवून घेणे उपयुक्त ठरेल. यामुळे तुम्हाला धुक्यातदेखील गाडी चालवण्याची सुरक्षितता वाढवेल.

वाइपर ब्लेड [Wiper blade]

पावसाळ्या व्यतिरिक्त इतर ऋतूंमध्ये गाडीच्या वाइपर ब्लेडचा फारसा उपायोग फारसा कुणी करत नाही. त्यांची तितकी गरजही नसते. आता, पावसाळा असल्याने, वायपर योग्यरित्या काम करत आहे की नाही आणि ब्लेडने विंडशील्ड व्यवस्थित साफ होत आहे की नाही हे तपासून पाहावे. वायपर ब्लेड्सच्या रबरवर उन्हाचा अनेकदा परिणाम होतो. उष्णतेमुळे जर वायपर ब्लेड खराब झाले असतील तर, त्यांना वेळीच बदलून घेणे योग्य ठरू शकते.

कार बॉडी कव्हर [Car body cover]

पावसाळ्यामध्ये कार बॉडी कव्हर असणे हे अत्यंत उपयुक्त साधन आहे. पावसाळ्यात गाडी पार्क करण्यासाठी बिना छताची जागा असल्यास ही ऍक्सेसरी तुमच्यासाठी अतिशय फायद्याची ठरेल. कार बॉडी कव्हरमुळे गाडीचे केवळ पावसापासून रक्षण नाही तर, गाडीवर पडणाऱ्या पाण्याच्या डागापासून, पक्ष्यांची विष्ठा आणि धुळीपासूनदेखील संरक्षण होईल.

हेही वाचा : Car tips : गाडीची बॅटरी कशी बदलायची? या सहा स्टेप्स लक्षात ठेवा, कधीही पडू शकतात उपयोगी..

मडफ्लॅप [Mudflap]

मडफ्लॅप हे वाहनाच्या सामान्य उपकरणांपैकी एक आहे. मोल्डेड प्लॅस्टिकने बनवलेली ही ऍक्सेसरी, वाहनाच्या धातूच्या भागाचे चिखलापासून संरक्षण करण्यासाठी चाकांच्या पुढ्यात लावण्यात येते. मडफ्लॅप्समुळे वाहनाचे रस्त्यावरील घाण, पाणी आणि टायरने उडणाऱ्या चिखलापासून संरक्षण होते.

[टीप – वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.]