TVS, Hero Motocorp, Ather आणि BMW सारख्या दुचाकी उत्पादक कंपन्या येत्या काही महिन्यांत त्यांच्या इव्ही लाँच करणार आहेत. दरम्यान, बुलेट निर्माता कंपनी रॉयल एनफिल्ड आपली इलेक्ट्रिक बाइक लाँच करण्याच्या तयारीत आहे. रॉयल एनफिल्डचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल म्हणाले की, भारतीय बाजारपेठ, उत्पादन आणि जागतिक बाइक मार्केटनुसार इलेक्ट्रिक बाइक्सची श्रेणी आणि वैशिष्ट्ये यावर चर्चा केली जात आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये, रॉयल एनफिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद दासारी यांनी पुष्टी केली होती की, आयशरच्या मालकीची कंपनी इलेक्ट्रिक मोटरसायकल सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची योजना आखत आहे. त्यानंतर कंपनीने २०२०-२१ च्या वार्षिक अहवालात इलेक्ट्रिक बाइक निर्मितीचा उल्लेख केला होता. रॉयल एनफिल्ड ही बाईक २०२३ मध्ये कधीही लाँच केली जाईल. यासाठी कंपनीने यूकेमध्ये रिसर्च सुरू आहे. या बाइकची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा असून ती पुढील वर्षी लाँच केली जाऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनोद दासारी यांनी केलेल्या घोषणेनुसार, कंपनीने रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाइकचा प्रोटोटाइप आधीच तयार केला आहे आणि लवकरच इव्हीचे उत्पादन सुरू करेल. रॉयल एनफिल्डने उत्पादित केलेली इलेक्ट्रिक बाइक नवीन इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित असण्याची अपेक्षा आहे आणि ती अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल.

Bharat NCAP: चारचाकी वाहनांमध्ये ६ एअर बॅग, सीट बेल्ट अलर्ट अनिवार्य; जाणून घ्या सर्वकाही

इंडिया कार न्यूजच्या अहवालानुसार, बाईक ८ किलोवॅट ते १० किलोवॅट पर्यंतचा बॅटरी पॅक वापरू शकते आणि ती इलेक्ट्रिक मोटरशी जोडली जाईल. इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील सध्याच्या ट्रेंडनुसार, बाइकची पॉवर आणि पीक टॉर्क सुमारे ४० बीपीएच आणि १०० एनएम असणे अपेक्षित आहे. याच्या डिझाईन आणि फीचर्सबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसली तरी बुलेट मॉडेलसारखे असू शकते अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Royal enfield will bring bullet like electric bikes rmt