Tata Motors आणि Maruti Suzuki या लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. या दोन्ही कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन कार मॉडेल्स लॉन्च करत असतात. टाटा मोटर्सने अलीकडेच आपली लोकप्रिय Altroz प्रीमियम हॅचबॅकची CNG सिरीज लॉन्च केली आहे. ज्याचे नाव Tata Altroz iCNG असे आहे. ही कार या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी बलेनो सीएनजीशी स्पर्धा करते. आज आपण Tata Altroz iCNG आणि मारुती सुझुकी बलेनो या दोन वाहनांच्या किंमतीची तुलना जाणून घेऊयात.
भारतातील पहिल्या ट्वीन सिलेंडर CNG टेक्नॉलॉजीसह येणारी Tata Altroz iCNG ही सहा व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तसेच मारुती सुझुकी बलेनो ही सीएनजीच्या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टूडे ने दिले आहे.
Altroz iCNG ची किंमत ही ७,५५,४०० रुपये ते १०,५४,९९० (एक्स-शोरूम) रुपयांदरम्यान आहे. तर मारुती सुझुकी बलेनोची किंमत ८,३५,००० रुपयांपासून ते ९,२८,००० (एक्स-शोरूम) रुपयांदरम्यान आहे. Tata Altroz iCNG च्या इतर व्हेरिएंट्सच्या किंमती (एक्स-शोरूम) जाणून घेऊयात.
१. Tata Altroz iCNG XE – ७,५५,४०० रुपये
२. Tata Altroz iCNG XM+ – ८,४०,४०० रुपये
३. Tata Altroz iCNG XM+ (S) – ८,८४,९०० रुपये
४. Tata Altroz iCNG XZ – ९,५२,९०० रुपये
५. Tata Altroz iCNG XZ+ (S) – १०,०२,९९० रुपये
६. Tata Altroz iCNG XZ+O (S) – १०,५४,९९० रुपये
Maruti Suzuki CNG च्या इतर व्हेरिएंट्सच्या किंमती (एक्स-शोरूम) जाणून घेऊयात.
१. Maruti Suzuki CNG Delta – ८,३५,०००
२. Maruti Suzuki CNG Zeta – ९,२८,०००
Altroz iCNG मध्ये १.२ लिटरचे रेव्होट्रॉन इंजिन वापरण्यात आले आहे. जे ७३.५ PS पॉवर आणि १०३ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्स्मिशनसह जोडलेले आहे.
Baleno CNG मध्ये १.२ लिटर K-Series इंजिन देण्यात आले आहे. जे ७७PS पॉवर आणि ९८.५ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल युनिटद्वारे जोडलेले आहे.