Hyundai Cheapest Car: Hyundai ही दीर्घकाळापासून देशातील दुसरी सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे. Hyundai Creta आणि Venue या कंपनीच्या दोन सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार आहेत. या दोन गाड्यांशिवाय कंपनीच्या आणखी एका कारलाही ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ही कंपनीची सर्वात स्वस्त कार Grand i10 Nios आहे. Hyundai ने काही काळापूर्वी Grand i10 Nios ची फेसलिफ्ट आवृत्ती लाँच केली आहे. ही देशातील लोकप्रिय हॅचबॅक कार आहे, जी स्विफ्टला टक्कर देते. हे कमी किमतीत भरपूर लक्झरी वैशिष्ट्ये आणि आकर्षक डिझाइन ऑफर करते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फेब्रुवारीमध्ये ‘इतकी’ झाली विक्री

जर आपण फेब्रुवारी महिन्याबद्दल बोललो तर Hyundai Grand i10 Nios ही कंपनीची तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार होती. फेब्रुवारीमध्ये, सर्व कार विक्रीच्या यादीत ते चौदाव्या क्रमांकावर होते. गेल्या महिन्यात ९६३५ युनिट्सची विक्री झाली आहे, तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ८५५२ युनिट्सची विक्री झाली होती. अशाप्रकारे, Grand i10 Nios च्या विक्रीत १३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

(हे ही वाचा : १ किंवा २ लाख नव्हे तर तब्बल ३.६० लाख रुपयांनी स्वस्त झाली ‘ही’ लोकप्रिय कार, खरेदीसाठी ग्राहकांची उडाली झुंबड )

Grand i10 Nios वैशिष्ट्ये

कारमध्ये अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये आहेत. टॉप व्हेरियंटमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, क्रूझ कंट्रोल, ऑटो हेडलाइट्स आणि पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, वायरलेस फोन चार्जर, रिअर व्हेंटसह ऑटो एसीसह ८-इंचाचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले मिळतो. कारमधील सेफ्टी किटमध्ये ६ एअरबॅग, EBD सह ABS, हिल असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर यांचा समावेश आहे.

Grand i10 Nios किंमत

Hyundai Grand i10 Nios एकूण चार ट्रिम्समध्ये येते, यात Era, Manga, Sportz आणि Asta यांचा समावेश आहे. त्याची Magna आणि Sportz मॉडेल्स देखील CNG किटसह उपलब्ध आहेत. हॅचबॅकची किंमत ५.६८ लाख ते ८.४७ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. कारचे टॉप मॉडेल तुम्हाला हॅचबॅकमध्ये हव्या असलेल्या सर्व आवश्यक वैशिष्ट्यांसह येते.


मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The third best selling hyundai model in february 2023 is the grand i10 which saw a design update recently pdb