Best Selling Sedan: भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्ही अशा विविध सेगमेंटमध्ये मोठ्या संख्येत कारचे पर्याय ग्राहकांसमोर आहेत. एसयूव्ही सेगमेंटच्या कारची मागणी अलीकडे वाढली असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून सेडान सेगमेंटच्या कार भारतीयांची पहिली पसंती राहिल्यात. अजूनही स्टायलिश डिझाइनसह जास्त स्पेसमुळे अनेकजण सेडान कारलाच प्राधान्य देतात. आज आम्ही तुम्हाला भारतीय बाजारपेठेत कोणत्या सेडान कारची मागणी वाढली आहे, याबद्दल माहिती देत आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेहमीप्रमाणे, मारुती सुझुकी डिझायर ही गेल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी २०२४ मध्ये सर्वाधिक विक्री होणारी सेडान कार होती. Dzire ने Verna, Amaze, Tigor यासह इतर सर्व सेडान मॉडेल्सना मागे टाकलं आहे. मारुती सुझुकी डिझायर गेल्या महिन्यात १६ हजार ७७३ ग्राहकांनी खरेदी केली होती. डिझायरच्या विक्रीत वार्षिक ४८ टक्के वाढ झाली आहे. जानेवारी २०२३ मध्ये ११ हजार ३१७ लोकांनी मारुती डिझायर विकत घेतली. Maruti Suzuki Dzire ची एक्स-शोरूम किंमत ६.५७ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ९.३९ लाख रुपयांपर्यंत जाते.

(हे ही वाचा:टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं सर्वांना फोडला घाम; झाली दणक्यात विक्री, किंमत फक्त…)

Hyundai Aura ही जानेवारी २०२४ मधील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी सेडान होती, जी ५ हजार ५१६ ग्राहकांनी खरेदी केली होती. यानंतर होंडा अमेझ तिसऱ्या स्थानावर राहिली, ज्याला २ हजार ९७२ लोकांनी खरेदी केले. अमेझसोबत घडलेली सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, या कारची विक्री वार्षिक ४७ टक्क्यांनी घटली.

Hyundai Verna ही गेल्या जानेवारीमध्ये चौथी सर्वाधिक विक्री होणारी सेडान होती, जी २ हजार १७२ लोकांनी खरेदी केली होती. Vernaच्या विक्रीत वार्षिक ११८ टक्के वाढ झाली आहे. यानंतर Volkswagen Virtus चा क्रमांक लागतो, जे १ हजार ८७९ ग्राहकांनी ३६ टक्के वार्षिक वाढीसह खरेदी केली आहे.

मारुती सुझुकी डिझायर सेडानमध्ये १.२L ड्युअलजेट पेट्रोल इंजिन आहे जे ९०PS कमाल पॉवर आणि ११३Nm पीक टॉर्क जनरेट करते. Dzire ५ स्पीड मॅन्युअल आणि ५ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह विकली जाते. दुसरीकडे, मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, मारुती डिझायरच्या पेट्रोल प्रकारांचे मायलेज २२.६१kmpl पर्यंत आहे, Dzire CNG चे मायलेज ३१.१२km/kg पर्यंत आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top selling sedans maruti suzuki dzire becomes best selling sedan in january 2024 pdb