बजाज या आघाडीच्या दुचाकी उत्पादक कंपनीची पल्सर बाईक सिरीज खूप लोकप्रिय आहे. यातच पल्सर 180 बाईकसह अनेक दुचाकींचा समावेश आहे. भारतीय बाजारपेठेत या बाईकची किंमत ८५,००० ते १,१६,६५३ च्या दरम्यान आहे. ही स्पोर्ट्स बाईक अनेक सेकंड हँड टू व्हीलर खरेदी आणि विक्री वेबसाइटवर कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहे. जर तुम्हाला ही बाईक आवडली असेल, तर २० ते ३० हजार रुपयांच्या बजेटमध्ये ही बाईक तुम्हाला घरी आणता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Second Hand Bajaj Pulsar 180
बजाज पल्सर 180 बाईकचे २०१२ मॉडेल DROOM वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध केले गेले आहे. या बाईकची नोंदणी दिल्ली क्रमांकावर करण्यात आली आहे. तुम्ही ही बाईक येथून २० हजार किमतीत खरेदी करू शकता. त्याच वेळी, कंपनी ते खरेदी करण्यासाठी फायनान्स प्लॅनचा लाभ देखील देत आहे.

आणखी वाचा : प्रतीक्षा संपली! Jeep Grand Cherokee नोव्हेंबर २०२२ ला भारतात लाँच होणार; टीझर रिलीज

Bajaj Pulsar Second Hand
बजाज पल्सर 180 बाईकचे २०१३ मॉडेल OLX वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. तुम्ही ही बाईक येथून २२,५०० च्या किमतीत खरेदी करू शकता. तुम्हाला बाईक सोबत कोणतेही कर्ज किंवा इतर ऑफर मिळणार नाहीत.

Used Bajaj Pulsar 180
बजाज पल्सर 180 बाईकचे २०१४ मॉडेल BIKE4SALE वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या बाईकची नोंदणी दिल्ली क्रमांकावर करण्यात आली आहे. तुम्ही ही बाईक येथून २५,००० च्या किमतीत खरेदी करू शकता. तुम्हाला बाईक सोबत कोणतेही कर्ज किंवा इतर ऑफर मिळणार नाहीत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Used bajaj pulsar 180 available with attractive finance plans pdb