प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते की, आपल्याकडे कार असली पाहिजे. कार खरेदी करताना विमा (Insurance) सर्वात महत्त्वाचा असतो. विम्याशिवाय वाहन चालवणे हा भारतात गुन्हा आहे. वाहनाचा विमा काढणं अनिर्वाय आहे. नवीन कार घेत असताना सर्व प्रकारचा विमा (Insuranc) काढला जातो. कार विमा असणे आज खूप महत्वाचे आहे. यामुळे अपघात, चोरी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास आर्थिक नुकसान होण्यापासून तुमचे संरक्षण होऊ शकते. कायदेशीर दृष्टिकोनातूनही हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. विम्याशिवाय तुम्ही वाहन चालवू शकत नाही. जर तुम्ही विम्याशिवाय गाडी चालवताना पकडले गेले तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गाडी घरी आल्यानंतर आपण तिच्या सुरक्षेची काळजी घेतो. म्हणूनच कार विमा काढण्याचा विचार केला जातो. विमा काढण्यासाठी शोरूम तुमच्याकडून अधिक पैसे घेत असते. पण नवीन कार खरेदी केल्यानंतर जर तिचा अपघात झाला किंवा इतर कोणती समस्या आल्यानंतर विम्याद्वारे सर्वकाही नुकसान मोफत दिले जाते. त्याच वेळी, आजच्या काळात, कार पॉलिसी विकणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. कार किंवा वैयक्तिक वाहनाबरोबर इन्शुरन्स घेणं अनिवार्य असतं. त्यामुळं इन्शुरन्स कंपन्यांचे नियम आणि हा इन्शुरन्स घेताना काय खबरदारी घ्यायला हवी, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

कार विम्याबद्दल ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

  • वाहन कायद्यानुसार, कार खरेदी करताना त्याचा विमा काढणे गरजेचे आहे. कार विमा असल्यानं ग्राहकांना कित्येक प्रकारचे फायदे मिळू शकतात. कारमध्ये कोणत्याही प्रकारचे डॅमेज होण्याच्या स्थितीमध्ये लोकांसाठी नुकसान भरपाई मिळू शकते. जर तुम्ही नवीन कार खरेदी करत असाल आणि तुम्हाला एजन्सीकडूनच विमा कवच मिळत असेल, तर तुम्ही तिथेही विमा संरक्षण घ्या. परंतु पॉलिसी घेताना अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरुन नंतर तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये.
  • वाहनाच्या इन्शुरन्समुळे विविध प्रकारचं संरक्षण मिळतं. अपघातामुळे किंवा इतर कारणाने तुमच्या वाहनाचं कोणतंही नुकसान झालं, वाहनाची चोरी झाल्यास इन्शुरन्समुळे काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळू शकते. त्यामुळेच तुमच्या वाहनाचा इन्शुरन्स (Vehicle Insurance) आहे ना, याची खात्री करा. तसंच त्याची मुदत संपली असेल तर तात्काळ त्याचं नूतनीकरण करा. याशिवाय, तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत आहात, तर नवीन किंवा वापरलेली कोणतीही कार घेताना कारच्या इन्शुरन्स बाबत संपूर्ण माहिती मिळवा.
  • भारतीय रस्ता सुरक्षा कायदा आणि भारतीय मोटार वाहन कायद्यानुसार रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी विमा पॉलिसी घेणे आवश्यक आहे. कारचा विमा काढताना तुमच्या गरजा समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. सर्वोत्कृष्ट कार विमा आणि सर्वोत्कृष्ट विमा कंपनी जाणून घेण्यापूर्वी, वाहन मालकाने त्याच्या गरजा तपासल्या पाहिजेत आणि कोणत्या प्रकारची पॉलिसी हवी आहे, हे स्वत: जाणून घेतलं पाहिजे. भारतात दोन प्रकारच्या कार विमा पॉलिसी आहेत, ज्यात तृतीय पक्ष विमा (थर्ड पार्टी) आणि सर्वसमावेशक विमा (कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन) यांचा समावेश आहे. तुमच्या वाहनासाठी चांगलं कव्हरेज देणारा विमा निवडावा.

(हे ही वाचा:New Car Buying Guide: नवीन कार खरेदी करायचा विचार करताय? ‘या’ ७ गोष्टींविषयी जाणून घ्या, नाहीतर बसेल मोठा फटका)

१. थर्ड पार्टी इन्शुरन्स

या प्रकारच्या विम्यामध्ये कंपनी दुसऱ्या पक्षाच्या नुकसानीची भरपाई करते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर दुसऱ्या गाडीचं झालेलं नुकसान विमा कंपनी नुकसानभरपाई म्हणून देईल. १९८८ च्या वाहन कायद्यानुसार हे अनिवार्य आहे. मोटार वाहन कायद्यानुसार हा विमा सर्व वाहनांना अनिवार्य आहे. मात्र, या विम्यातून तुमच्या स्वत:च्या गाडीला झालेले नुकसान कव्हर होत नाही. म्हणजेच तुमच्या गाडीचं झालेलं नुकसान तुम्हालाच स्वखर्चाने भरुन काढावं लागेल.  

२. सर्वसमावेशक विमा

या प्रकारच्या विमामध्ये विमा कंपनी नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देतात. सर्वसमावेशक कार विमा पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारकाला जास्तीत जास्त संरक्षण कव्हरेज मिळते. हे तृतीय पक्ष दायित्व, वाहनांचे नुकसान, वैयक्तिक अपघात कव्हर आणि वादळ पुर, आग, चोरी यासारख्या सर्व प्रकारच्या गैर-टक्कर नुकसानसाठी संरक्षण प्रदान करते.

  • विमा खरेदी करण्यापूर्वी, विमा प्रदाता कंपनीचा CSR म्हणजेच क्लेम सेटलमेंट रेशो तपासा. ज्यावरून विमा पुरवठादार कंपनीने गेल्या वर्षभरात किती दावे यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत हे कळते. जर कंपनीचे प्रमाण योग्य असेल तर तुम्ही त्यातून विमा घेऊ शकता. विमा खरेदी करण्यापूर्वी विमा प्रीमियमची तुलना केली पाहिजे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या प्लॅनच्या किमतींमध्ये तुम्हाला बराच फरक दिसतो. काही
  • दुर्दैवानं तुम्हाला कार इन्शुरन्ससाठी क्लेम (दावा) करण्याची गरज पडलीच तर ती आपल्या खिशातून कमीत कमी खर्च होऊन पूर्ववत व्हावी, याची काळजी घेतली गेली पाहिजे. विमा सुविधा ही अपघात आणि चोरी दोन्हीसाठी लागू असायला हवी. लहान दुर्घटनेपासून ते एखाद्या मोठ्या दुर्घटनेपर्यंत उपयोगी असेल अशा प्रकारचे कव्हरेज घ्यायला हवे. विशेषतः ‘बंपर टू बंपर कव्हरेज’ असणं महत्त्वाचं असतं. काही पॉलिसींमध्ये ही सुविधा देण्यात येत नाही.
  • जर तुम्ही स्वतःसाठी कार इन्शुरन्स पॉलिसी घेणार असाल तर त्यासाठी बऱ्याच गोष्टी तपासून घ्या, याद्वारे तुमच्यासमोर अनेक पर्याय असतील. त्यासोबतच, कार विमा पॉलिसी घेताना तुम्ही आयडीव्ही (IDV) तपासणे आवश्यक आहे. आयडीव्ही म्हणजे विमा उतरवलेली घोषणा मूल्य. जर तुमची कार चोरीला गेली असेल तर विमाकर्ता तुमच्या कारसाठी IDV च्या आधारे पूर्ण पैसे देऊ शकतो.
  • आयडीव्ही वाहनांच्या इन्शुरन्समधील सर्वात महत्त्वाची बाब आहे. विमा कंपनीच्यानुसार, आपल्या वाहनाची सध्याची किंमत किती आहे? हे IDV द्वारे समजू शकते. जर आपल्या वाहनाचं एवढं नुकसान झालं असेल की, त्याची दुरुस्ती करणं शक्यच नसेल अशावेळी इन्शुरन्स कंपनी IDV नुसार ठरवलेली किंमत आपल्याला देत असते. तसंच जर आपली गाडी चोरी झाली तर इन्शुरन्स कंपनी आपल्याला जास्तीत जास्त जी रक्कम देत असते ती असते IDV.

(हे ही वाचा: फास्टॅग कसा बंद करतात? त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी फॉलो करा ‘ही’ प्रक्रिया)

वाहन विषयक तज्ज्ञ ओंकार भिडे सांगतात, स्वयंचलित वाहनाचा कॉम्प्रीहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी करणे आवश्यक आहे, तर कायद्यानुसार थर्ड पार्टी इन्शुरन्स करणे बंधनकारक आहे. आपली व दुसऱ्यांची जोखीम कमी करण्यासाठी इन्शुरन्स कडे गांभीर्याने बघितले पाहिजे. तसेच तो वेळोवेळी रिन्यूदेखील केला पाहिजे.

विम्याचे फायदे

१) कार विमा पॉलिसीमुळे तुम्हाला आर्थिक संरक्षण मिळते. दुर्दैवी अपघात किंवा कार खराब झाल्यास आर्थिक संरक्षण देण्यासाठी हे उपयुक्त आहे.

२) अपघात, दंगल, चोरी, दहशतवाद, नैसर्गिक आपत्ती आणि आग, स्फोट, पूर, वादळ, भूकंप इत्यादी आपत्तींमुळे वाहनाचे नुकसान झाल्यास भरपाई दिली जाते.

३) कार विमा पॉलिसी घेतल्यामुळे कायदेशीर संरक्षण देखील मिळते. जर अपघात झाला आणि त्यात कोणीतरी जखमी झाले किंवा मृत्यू झाला तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. कार विमा पॉलिसीमुळे या कायदेशीर कारवाईचा खर्च कमी होण्यास मदत होते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is a motor insurance here is all you need to know about vehicle insurance ltdc pdb