‘भी मरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती’ हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मारुती स्तोत्र
आनंदाचे गाणे
आला उन्हाळा
मुले झाली गोळा
झाडाच्या फांदीवर
बांधला झोपाळा
खेळ म्हणे खास
नाही कसला ध्यास
झोपाळ्यावर बसू आता
तासन् तास
झाडाच्या सावलीत
वेळ मुले घालवीत
झोपाळ्यावर बसायला
पाखरांना बोलवीत
मुले खेळ खेळतात
वाऱ्यासंगे पळतात
झोका उंच घेऊन
आकाशाशी बोलतात
झोके घेती भरभर
फांदी वाजे करकर
आनंदाचे गाणे
साऱ्यांच्या ओठावर
मुले गात बसतात
कुणावर ना रुसतात
टाळी देत उन्हाला
खूप खूप हसतात
-एकनाथ आव्हाड