हिवाळय़ात कडक थंडीत अंगात गरम कपडे न घालता बाहेर पडलो तर आपण काकडू लागतो. आपण विचारपूर्वक थांबवू म्हटलं तरी शरीराची थरथर थांबत नाही. असे का घडते? थंडीत काकडणे ही शरीराची
बटाटा चिप्सचा इतिहास
कुरकुरीत व चटकदार बटाटा चिप्स खाण्यास कोणी नकार देईल का? नाही. प्लेटमध्ये समोर आल्यावर
१८८५ साली न्यूयॉर्कमधील एका रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाने फ्राइड पोटॅटो पातळ व चवदार नसल्याची तक्रार केली. त्यामुळे रागारागात शेफने बटाटय़ाचे अत्यंत पातळ तुकडे करून ते पाण्यात टाकले. नंतर तो ते विसरून गेला. दुसऱ्या ग्राहकाने फ्राइड पोटॅटो मागविले तेव्हा त्याला त्याची आठवण झाली. गडबडीने त्याने पाण्यातून पातळ कापलेल्या बटाटय़ाच्या चकत्या उकळत्या तेलात टाकल्या. त्याच्या कुरकुरीत बटाटा चिप्स तयार झाल्या. तेव्हा त्याला अत्यंत आश्चर्य वाटले. त्यातूनच जगातील या मनपसंत स्नॅक्सचा जन्म झाला. १७ व्या शतकात पोर्तुगालमधून बटाटा भारतात आला. आता संपूर्ण भारतात बटाटय़ाचे मोठय़ा प्रमाणावर पीक घेतले जाते. बटाटय़ात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. परंतु चिप्स करण्याकरता बटाटा तळला असता त्यातील व्हिटॅमिन ‘सी’ कमी होते.
रंग बदलणारे पहाड
सरडा रंग बदलतो ही गोष्ट आपणा सर्वाना माहीत आहे. परंतु पहाड रंग बदलतात हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असणार ना! दक्षिण ऑस्ट्रेलियात आयर्स रॉक हे असे पहाड आहेत, जे दररोज आणि प्रत्येक ऋतूत रंग
ऑस्ट्रेलिया सरकारने या पहाडाजवळ ४८७ चौ. मलांच्या क्षेत्रात ‘माऊंट ओल्गा’ राष्ट्रीय पार्क तयार केला आहे. या पार्कमध्ये ऑस्ट्रेलियातील कांगारू, बालाबी, यूरोसारखे विचित्र प्राणी ठेवले आहेत. येथे नवनवीन विचित्र झाडे लावली आहेत. या सर्व कारणांमुळे हजारो लोकांचे आकर्षण केंद्र बनले आहेत हे पहाड!
भारतीय नाण्यांचा प्राचीन इतिहासभारतात नाणी बनविण्यासाठी फार पूर्वी शुद्ध धातूचे ठरावीक वजनाचे तुकडे घेऊन ठोकून ठोकून त्यांना गोलाकार अगर लंबचौरस आकार देण्यात येत असत. किंवा ठोकी व पत्र्याचे ठरावीक वजनाचे लंबचौरस तुकडे कापण्यात येत. हेच गोलाकार वा लंबचौरस तुकडे नाणी म्हणून वापरली जात. अशा खुणा उमटवलेली नाणी इसवीसना पूर्वी ८०० च्या सुमारास भारतात प्रचलित होती. भारताच्या ठोक खुणेच्या नाण्यांइतकी जुनी नाणी अजूनही अन्यत्र कोठेही सापडलेली नाहीत आणि म्हणूनच भारतातील ही नाणी जगातील सर्वात जुनी नाणी समजली जातात. भारतातील मुद्रांचा खोल अभ्यास केलेले इंग्रजी विद्वान ब्राऊन यांच्या मते, ओतीव नाणी इ.स.पूर्व पाचव्या अगर सहाव्या शतकापासून भारतात तयार होत असावीत.
देवघेवीत कागदी नोटांचा वापर करण्याच्या शक्यतेची मूळ कल्पना दिल्लीच्या वेडय़ा महंमदाने प्रथम जगाला दिली. तांब्याच्या नाण्याला सोन्याच्या नाण्याची दिलेली किंमत यात फरक असा तो काय? असा विचार करून आíथक तंगीवर इलाज म्हणून त्याने ही प्रथा प्रथम सुरू केली. सव्वाचारशे वर्षांपूर्वी शेरशहाने सुरू केलेले ‘रुपया’ हे नाणे आजही आपल्या जीवनात मानाचे स्थान पटकावून बसले आहे. शिवछत्रपतींनी राज्याभिषेकानंतर तांब्याची व सोन्याची नाणी पाडली. तांब्याची नाणी ‘शिवराई’ या नावाने ओळखली जात. या नाण्याच्या एका बाजूला ‘छत्रपती’ व दुसऱ्या बाजूला ‘श्रीराजा शिव’ असा आलेख उमटवलेला असे. सोन्याच्या नाण्याला ‘होन’ म्हणून संबोधण्यात येत असे.
(समाप्त)