India Budget 2025 Live Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात नव्या करप्रणालीची घोषणा त्यांनी केली. त्यानुसार १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची मोठी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे. त्याचसोबत पुढील सर्व टॅक्स स्लॅब्जमध्येही त्यांनी बदल केले असून त्यानुसार करदात्यांना भराव्या लागणाऱ्या करात सूट मिळाली आहे. त्यामुळे करदात्यांसाठी हा अर्थसंकल्प मोठा दिलासा देणारा ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मात्र, त्याचवेळी विरोधकांकडून हा अर्थसंकल्प म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केलेल्या घोषणा असल्याची टीका केली जात आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पावरील राहुल गांधींच्या विधानावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “काँग्रेसने या अर्थसंकल्पावर अजिबात टीका करू नये, त्यांनी मध्यमवर्गाला किती दिलासा मिळाला आहे ते पाहिले पाहिजे. आपल्या देशावर ६० वर्षे राज्य केल्यानंतरही, ते आयकर सवलत स्लॅब ५ लाख रुपयांपेक्षा जास्त वाढवू शकले नाहीत. आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केवळ मध्यमवर्गालाच नाही तर ननिम्न मध्यम वर्ग आणि उच्च मध्यमवर्गीयांनाही सूट दिली आहे.”
Union Budget 2025 Highlights, 1 February 2025: अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठीच्या घोषणांचा समावेश
India Budget 2025 Live Updates: नागरी क्षेत्रातील सुधारणांविषयी…
सरकार १ लाख कोटींचा अर्बन चॅलेंज फंड तयार करेल. शहरांमधील सुधारणा राबवण्यासाठी हा निधी वापरला जाईल. हा निधी बँकेबल प्रकल्पांच्या खर्चापैकी २५ टक्के खर्च उचलण्यासाठी वापरला जाईल – निर्मला सीतारमण
ऑनलाईन गिग वर्कर्सकडून मोठ्या प्रमाणावर सेवा पुरवली जाते. त्याच्यासाठी ओळखपत्र तयार करून त्यांना ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याची तरतूद केली जाईल. पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत त्यांना आरोग्य सेवा पुरवली जाईल. १ कोटी गिग वर्कर्सला यातून फायदा होईल – निर्मला सीतारमण
News Alert! Govt to arrange identity cards and registration on e-shram portal to assist 1 crore gig workers: FM.#BudgetSessionWithPTI #Budget2025WithPTI pic.twitter.com/zIfRr47XHX
— Press Trust of India (@PTI_News) February 1, 2025
Budget 2025 FM Nirmala Sitharaman Live Updates:
पुढील पाच वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १० हजार जागा वाढवणार – निर्मला सीतारमण
Union Budget 2025 Live Updates, 1 February 2025:
सेंटर फॉर एक्सलन्स इन एआय – शिक्षण क्षेत्रासाठी अशा प्रकारचं सेंटर उभारलं जाईल. त्यासाठी ५ हजार कोटींची तरतूद केली जाईल – निर्मला सीतारमण
Budget 2025 FM Nirmala Sitharaman Live Updates:
२३ आयआयटींमधील विद्यार्थी क्षमता ६५ हजाराहून १.३५ लाखांपर्यंत गेल्या १० वर्षांत वाढली आहे. ही वाढ १०० टक्के इतकी आहे. २०१४ नंतर सुरू झालेल्या पाच आयआयटींमध्ये अतिरिक्त सोयी-सुविधा उभारल्या जाणार आहेत. पाटणा आयआयटीमधील हॉस्टेल सुविधाही वाढवल्या जातील – निर्मला सीतारमण
FM Nirmala Sitharaman budget 2025 Speech Live Updates:
भारतीय भाषा पुस्तक योजना – यातून शाळा व उच्च शिक्षणासाठी भारतीय भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध करून दिली जातील. यातून विद्यार्थ्यांना त्यांचे विषय त्यांच्या भाषेत समजून घेणं सोपं जाईल – निर्मला सीतारमण
Budget 2025 FM Nirmala Sitharaman Live Updates:
तिसरं इंजिन गुंतवणूक… लोकांमध्ये, अर्थव्यवस्थेत आणि संशोधनात गुंतवणूक करणे
१. सक्षम अंगणवाडी पोषण कार्यक्रम – यात ८ कोटींहून अधिक मुलांना पोषक आहार पुरवला जाणार. यासाठीचा खर्च वेळ येईल तसा वाढवला जाईल.
२. अटल टिंकरिंग लॅब – अशा ५० लाख लॅब पुढच्या पाच वर्षांत सरकारी शाळांमध्ये उभ्या केल्या जातील.
सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवली जाईल
भारताला खेळणी उद्योगात जगात अग्रस्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. मेड इन इंडिया ब्रँडच्या नावाने जगभरात टिकाऊ खेळण्यांच्या उत्पादनात भारताला नाव मिळवून देण्यासाठी काम केलं जाईल – निर्मला सीतारमण
Live analysis of Budget 2025 announcements in Marathi:
मागास वर्गातील महिलांसाठी नवी योजना राबवण्यात येईल. त्यातून ५ लाख महिलांना लाभ मिळू शकेल. या महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जाईल – निर्मला सीतारमण
Union Budget 2025 Live Updates, 1 February 2025:
देशात ५. ७ कोटी लघुउद्योग असून त्यातून ७.५ कोटी लोकांना रोजगार मिळत आहे. लघु उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार – निर्मला सीतारमण
बिहारमध्ये मखाणा उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विशेष मखाणा बोर्डाची स्थापना केली जाणार.
VIDEO | Union Budget 2025: Finance Minister Nirmala Sitharaman (@nsitharaman) says, "Makhana Board in Bihar. For this, there is a special opportunity for the people of Bihar. A Makhana Board will be established in the state to improve production, processing, value addition and… pic.twitter.com/V7SxFz7unq
— Press Trust of India (@PTI_News) February 1, 2025
भारताचा मत्स्य उत्पादनात जगभरात दुसरा क्रमांक लागतो. त्यात शाश्वत उत्पादन प्रक्रिया राबवण्यासाठी काम केलं जाईल. अंदमान-निकोबार बेटांच्या परिसरावर लक्ष केंद्रीत केलं जाईल.
Govt to bring enabling framework for sustaining harvest of fisheries sector in exclusive economic zones and high seas: says FM
— Press Trust of India (@PTI_News) February 1, 2025
तूर, उडीद आणि मसूर डाळींच्या उत्पादनासंदर्भात विशेष लक्ष दिलं जाणार. नाफेड, एनसीसीएफकडून डाळींची खरेदी केली जाणार – निर्मला सीतारमण
सरकार पंतप्रधान धनधान्य योजना राज्य सरकारांसोबत राबवेल. त्यात शेती उत्पादकता वाढवणे, विविध प्रकारची उत्पादनं आणि शाश्वत विकास साध्य करणं, माल साठवणूक पर्याय, सिंचन सुविधा आणि क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देणे या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं असेल. यातून १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल. यात १०० जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत केलं जाईल – निर्मला सीतारमण
PTI INFOGRAPHICS | Union Budget 2025: Highlights of Finance Minister Nirmala Sitharaman's budget speech in Lok Sabha (n/6)#BudgetSessionWithPTI #Budget2025WithPTI pic.twitter.com/9s5KrlxI0a
— Press Trust of India (@PTI_News) February 1, 2025
Union Budget 2025 Live Updates, 1 February 2025:
सहा महत्त्वाचे घटक
१. कर
२. उर्जा
३. नागरीकरण
४. खाणकाम
५. अर्थ विभाग
६. शेती विभाग
Union Budget 2025 Live Updates, 1 February 2025: मध्यमवर्गाला बळ देणारा अर्थसंकल्प – निर्मला सीतारमण
हा अर्थसंकल्प विकासदर वाढवणं, सर्वंकष विकास, खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणं, भारतातल्या मध्यमवर्गाला बळ देणं या सरकारच्या हेतूंनुसारच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे – निर्मला सीतारमण
करदात्यांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात काय? कोणती नवीन घोषणा होणार? केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या भाषणाला सुरुवात.. विरोधकांची गोंधळाला सुरुवात
Budget 2025 FM Nirmala Sitharaman Live Updates: निर्मला सीतारमण यांच्या भाषणाला सुरुवात
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात…
#UPDATE | Union Cabinet approves #UnionBudget2025, meeting concludes.
— ANI (@ANI) February 1, 2025
Budget 2025 FM Nirmala Sitharaman Live Updates: रोहित पवार यांची अर्थसंकल्पावर खोचक पोस्ट
पॉपकॉर्नच्या चवीनुसार #gst लावून कायमच मध्यमवर्गीयांची चव बेचव करणाऱ्या अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याची गरज आहे. केवळ आकड्यांचा खेळ न करता मध्यमवर्गीयांचे चार पैसे कसे वाचतील, याकडं अधिक लक्ष द्यावं. एकीकडं वाढत चाललेली महागाई तर दुसरीकडं जीएसटी च्या भारामुळे माध्यमवर्गीयांचं कंबरडं मोडलंय.. त्यामुळं यंदाच्या अर्थसंकल्पात आयकर स्लॅब सुधारून किमान १० लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना आयकर भरण्यापासून सूट द्यावी. तसंच किमान १५ ते २० लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी प्राप्तीकराचे दर कमी करावेत. गृहकर्जाचा व्याजदर जास्त असल्याने आजही लाखो मध्यमवर्गीय कुटुंबांचं घराचं स्वप्न अपूर्ण आहे, ते पूर्ण व्हावं म्हणून गृहकर्जावरील व्याजदर कमी करावेत. तसंच आज आरोग्यावरचा खर्च कुणालाही परवडत नाही, या पार्श्वभूमीवर आरोग्य विम्यावरचा जीएसटी कमी केल्यास मध्यमवर्गीयांना अधिक प्रमाणात आरोग्य विमा उतरवता येईल. म्हणून या बजेटमधून सर्वसामान्यांचं दैनंदिन आयुष्य सुकर होईल, असे निर्णय अर्थमंत्र्यांनी घ्यावेत, ही विनंती – रोहित पवार
पॉपकॉर्नच्या चवीनुसार #GST लावून कायमच मध्यमवर्गीयांची चव बेचव करणाऱ्या अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याची गरज आहे. केवळ आकड्यांचा खेळ न करता मध्यमवर्गीयांचे चार पैसे कसे वाचतील, याकडं अधिक लक्ष द्यावं. एकीकडं वाढत चाललेली महागाई…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 1, 2025
Union Budget 2025 Live Updates, 1 February 2025: अर्थसंकल्पावर किरेन रिजिजू यांची प्रतिक्रिया
अर्थसंकल्पावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची प्रतिक्रिया…
#WATCH | #UnionBudget2025 | Union Parliamentary Affairs Minister Kiren Rijiju says, "The country has witnessed that despite world-facing multiple issues, India's economy is growing and the country is moving ahead. Nirmala Sitharaman is going to present her record number (8th) of… pic.twitter.com/Ow7mGEnSng
— ANI (@ANI) February 1, 2025
अर्थसंकल्पाचे सर्व अपडेट्स तर मिळतीलच, पण त्यातील क्लिष्ट व गुंतागुंतीच्या बाबींचं सविस्तर विश्लेषण व विशेष लेख वाचण्यासाठी सबस्क्राइब करा लोकसत्ता प्रीमियम!
Union Budget 2025 Live Updates: अर्थसंकल्पाचा Sensex वर काय परिणाम होणार?
केंद्रीय अर्थसंकल्प आज मांडला जाणार असून त्याचा मुंबई शेअर बाजारात पहिल्या सत्रामध्ये सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स १३६.४४ अंकांनी वधारल्याचं दिसून आलं. त्याचवेळी निफ्टीही २०.२ अंकांनी वाढल्यामुळे गुंतवणूकदारांनी अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा व्यक्त केल्या आहेत.
Budget Session 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली
अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या संसदेत दाखल झाल्या असून त्यांच्या बरोबर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी देखील आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट देखील घेतली आहे. थोड्या वेळात संसदेत अर्थसंकल्प सादर होणार आहे.
Union Finance Minister Nirmala Sitharaman and MoS Finance Pankaj Chaudhary meet President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan. The #unionbudget2025 will be presented at the Parliament today. pic.twitter.com/yhU0UCM1v3
— ANI (@ANI) February 1, 2025
Budget Session 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर करणार; कोणत्या घोषणा होणार?
Budget Session 2025 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या संसदेत दाखल झाल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्पात पारंपरिक ‘बही खाता’ ऐवजी आता त्या टॅबद्वारे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार असून त्या सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
#watch | Delhi | Union Finance Minister Nirmala Sitharaman and MoS Finance Pankaj Chaudhary meet President Droupadi Murmu at the Rashtrapati Bhavan
— ANI (@ANI) February 1, 2025
Union Finance Minister Nirmala Sitharaman will present #unionbudget2025, today in Lok Sabha pic.twitter.com/ZSbZQyd2GE
Budget Session 2025 : घरं स्वस्त केली जाण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद होणार का?
Budget Session 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामधून कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात येणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. या अर्थसंकल्पामधून घरं स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यासाठी काही विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. मेट्रो शहरांमध्ये परवडणारी घरं सर्वसामान्यांना मिळावीत यासाठी महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. असं घडल्यास घर खरेदी करणाऱ्या अनेकांचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे.
Budget Session 2025 : अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही तास आधी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात
Budget Session 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काही तास आधी मोठी दिलासादायक बातमी आली आहे. कारण गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ७ रुपयांची कपात करण्यात आली आहे.
Budget Session 2025 : निर्मला सीतारमण सादर करणार देशाचा अर्थसंकल्प, ‘या’ सात घोषणांची शक्यता!
Budget Session 2025 : १ फेब्रुवारी २०२५ हा दिवस उजाडला आहे. आज देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे यात काहीही शंका नाही. कारण आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महागाई कमी करण्यासाठी आणि टॅक्समध्ये सवलत देण्यासाठी सरकारकडून मोठ्या घोषणा केल्या जातील अशी शक्यता आहे. दरम्यान या अर्थसंकल्पात सात मोठ्या घोषणा होऊ शकतात अशी चिन्हं आहेत. या सात घोषणा कुठल्या असू शकतात?
Budget Session 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर करणार
Budget Session 2025 LIVE : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्य जनतेला काय मिळणार? कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात येणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. या बरोबरच देशातील महागाई कमी करण्यासाठी काही महत्वाच्या घोषणा करण्यात येतात का? हे पाहणंही महत्वाचं असणार आहे.
Union Budget 2025 Live Updates in Marathi: सर्वात जास्त शब्दसंख्येचं अर्थसंकल्पीय भाषण
स्वतंत्र भारताच्या इतिहासात माजी पंतप्रधान दिवंगत मनमोहन सिंग यांनी १९९१ साली केंद्रीय अर्थमंत्री असताना केलेलं अर्थसंकल्पीय भाषण हे आत्तापर्यंतचं सर्वाधिक शब्दसंख्या असलेलं भाषण ठरलं आहे. त्यांनी १९९१ साली १८ हजार ६५० शब्दांचा अर्थसंकल्प सादर केला होता.
Economic Survey FY 2025-26: चालू वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर
शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४-२५ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. त्या आधारावर येत्या आर्थिक वर्षासाठी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ६.३ ते ६.८ टक्के इतका असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सरकारकडून वार्षिक दस्तऐवज सादर केले जातात. (PC : Nirmala Sitharaman FB, Freepik)