Gold-Silver Price On 18 October 2025: सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे बाजारात खरेदीसाठी नवचैतन्य निर्माण झालं आहे. भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त जसजसा जवळ येतो आहे, तसतशी ग्राहकांमध्ये सोनं आणि चांदी खरेदीसाठी उत्सुकता वाढत जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या दरांमुळे ग्राहकांची चिंता वाढली होती. सोनं १३५००० रुपये प्रति तोळा (GST सह) दरापर्यंत पोहोचल्यामुळे अनेकांनी खरेदी थांबवली होती.

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 18 October 2025)

आज इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने घसरले आणि चांदी वधारले. १८ ऑक्टोबर रोजीच्या सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोने १,२९,५८० रुपये, २३ कॅरेट १,२९,००७, २२ कॅरेट सोने १,८,७०० रुपयांवर आहे. १८ कॅरेट आता ९७,१९० रुपये, 14 कॅरेट सोने ७५,८१० रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे.

जळगावच्या मार्केटमध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याचा दरात तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह १,३२,००० वर आले आहेत. तर चांदीच्या दरात आठ हजार रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचे दर १,७८,००० रुपयांवरून १,७०,००० रुपयांपर्यंत आल्याने ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी धनत्रयोदशीला सोन्याचा भाव ७८,६१० रुपये प्रति १० ग्रॅम इतका होती.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.