Premium

म्युच्युअल फंडांना रेपो दराशी संलग्न साधनांमध्ये गुंतवणुकीस परवानगी

कॉर्पोरेट कर्ज रोख्यांसाठी दुय्यम बाजारात तरलता वाढवण्यासाठी गेल्या महिन्यात हा प्रस्ताव आणण्यात आला होता, त्याला सेबीने गुरुवारी मान्यता दिली.

sebi
(फाइल फोटो)

भांडवली बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंड घराण्यांना रेपो दराशी संलग्न गुंतवणूक साधने म्हणजेच कमर्शिअल पेपर (सीपी) आणि ठेव प्रमाणपत्रांमध्ये गुंतवणूक करण्यास गुरुवारी परवानगी दिली. म्युच्युअल फंड घराणे केवळ ‘एए’ आणि त्याहून अधिक चांगले मानांकन असलेल्या कॉर्पोरेट कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक करू शकतात.

रेपो दराशी संलग्न गुंतवणूक साधने मुख्यतः अल्पकालीन भांडवल उभारण्यासाठी वापरले जाते. कॉर्पोरेट कर्ज रोख्यांसाठी दुय्यम बाजारात तरलता वाढवण्यासाठी गेल्या महिन्यात हा प्रस्ताव आणण्यात आला होता, त्याला सेबीने गुरुवारी मान्यता दिली. रेपो दराशी संलग्न गुंतवणूक साधने श्रेणीमध्ये बॅंकेतर वित्तीय संस्था (एनबीएफसी), विमा कंपन्या आणि म्युच्युअल फंडांचा थेट सहभाग सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सेबीने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः मे महिन्यात ‘इक्विटी’ फंडातील गुंतवणुकीत घसरण; पण ‘SIP’च्या माध्यमातून योगदान १४,७४८.६८ कोटींच्या विक्रमी पातळीवर

दुसरीकडे सलग २७ व्या महिन्यात इक्विटी फंडातील गुंतवणूक सकारात्मक राहिली असली तरी ती सलग दुसऱ्या महिन्यात घसरत आली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया अर्थात ‘ॲम्फी’द्वारे जाहीर मासिक आकडेवारीनुसार, सरलेल्या मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडातील आवक घटली असली तरी गुंतवणुकीचा सर्वतोमुखी पर्याय बनलेल्या नियोजनबद्ध गुंतवणूक अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून मे महिन्यामधील योगदान १४,७४८.६८ कोटींच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. आधीच्या एप्रिल महिन्यात ‘एसआयपी’च्या माध्यमातून १३,७२७.६३ कोटी रुपये आणि मार्च महिन्यात १४,२७६ कोटी रुपयांची भर पडली होती.

हेही वाचाः १२००० रुपयांच्या कर्जातून व्यवसायाला सुरुवात अन् आज २.५ लाख कोटींची कंपनी स्थापून जगाला विकतोय सोनं, कोण आहेत राजेश मेहता?

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 20:35 IST
Next Story
स्टेट बँक ५०,००० कोटींचा निधी उभारणार