20% TCS on Credit Card : परदेशात प्रवास करताना तुम्ही क्रेडिट कार्डवरून खर्च करणार असाल तर तुमच्यासाठी नवीन कर नियम आला आहे. सरकारने आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या LRS (लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम) अंतर्गत ग्लोबल क्रेडिट कार्डद्वारे परदेशात केलेले पेमेंटला आणले आहे. १६ मे २०२३ पासून आता आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डद्वारे परदेशात केलेले पेमेंट आता RBI च्या LRS योजनेच्या कक्षेत आले आहे. त्यामुळे तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डने परकीय चलनात खर्च केल्यास LRS नियम लागू होणार आहे. LRS अंतर्गत आल्याने तुम्हाला ग्लोबल क्रेडिट कार्डवर परकीय चलनात केलेल्या खर्चावर १ जुलै २०२३ पासून अधिक TCS म्हणजेच स्त्रोतावर जमा केलेला कर भरावा लागेल. १ जुलैपासून यावर २०% TCS आकारला जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

LRS मध्ये आल्यानं तुमचा परदेश प्रवास महागणार?

२०२३ च्या अर्थसंकल्पात सरकारने परदेशी टूर पॅकेज आणि एलआरएसचे टीसीएस दर वाढवले ​​होते. टीसीएसचे दर सध्याच्या ५% वरून २०% पर्यंत वाढवले ​​आहेत. शिक्षण आणि वैद्यकीय खर्च वगळता नवीन TCS दर १ जुलै २०२३ पासून लागू होणार आहेत. तुम्ही तुमच्या टॅक्स रिटर्नमध्ये TCS चा दावा करू शकता.

हेही वाचाः सलग तिसऱ्या सत्रात मंदीवाल्यांची पकड घट्ट; सेन्सेक्समध्ये १२८ अंशांची घट

FEMA अंतर्गत सुधारित नियम

परकीय चलन व्यवस्थापन (चालू खाते व्यवहार) सुधारणा नियम २०२३ (परकीय चलन व्यवस्थापन कायदा) मंगळवारी अधिसूचित करताना वित्त मंत्रालयाने सांगितले की, आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डद्वारे परदेशात होणारा खर्च देखील LRS मध्ये समाविष्ट केला जात आहे.

हेही वाचाः देशातील सर्वात मोठ्या ‘या’ बँकेला १६,६९४ कोटींचा निव्वळ नफा

LRS म्हणजे काय?

LRS अंतर्गत एखादी व्यक्ती रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवायही एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त २.५ लाख डॉलर परदेशात पाठवू शकते. या अधिसूचनेमध्ये LRS चा समावेश केल्यानंतर २.५ लाख डॉलरपेक्षा जास्त किमतीचे विदेशी चलन पाठवण्यासाठी RBI ची परवानगी घेणे आवश्यक असेल. आतापर्यंत परदेशात प्रवास करताना झालेल्या खर्चासाठी आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्ड पेमेंट LRS च्या कक्षेत येत नव्हते.

FEMA चे कलम ७ काढले

वित्त मंत्रालयाने आरबीआयशी सल्लामसलत केल्यानंतर जारी केलेल्या अधिसूचनेत परकीय चलन व्यवस्थापन नियम, २००० चे कलम सात वगळले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डद्वारे परदेशात केलेले पेमेंटही एलआरएसच्या कक्षेत आले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rule on credit card payments has changed your foreign travel will be more expensive now vrd