SBI Q4 Results : देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडिया(State Bank of India)ने नुकत्याच सरलेल्या चौथ्या तिमाहीत १६,६९४ कोटींचा करोत्तर नफा कमावला. पत गुणवत्तेत सुधारणा आणि निव्वळ व्याजापोटी उत्पन्नात वाढीमुळे बँकेला ही सशक्त कामगिरी करता आली. सरलेल्या तिमाहीत बहुतांश मापदंडांवर बँकेला चांगली कामगिरी करता आली आहे. वर्षागणिक तिमाही नफ्यात ८३ टक्क्यांची भरीव वाढ झाली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षातील जानेवारी-मार्च तिमाहीत, स्टेट बँकेने ९,११३.५३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला होता. तर संपूर्ण आर्थिक वर्षात बँकेने ५०,२३२ कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. त्यात वार्षिक आधारावर ५९ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२१-२२ मध्ये बँकेने ३१,६७५.९८ कोटी रुपयांचा नफा मिळविला होता.

सरलेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत, बँकेचे व्याज उत्पन्न ३१ टक्क्यांनी वाढून ९२,९५१ कोटी रुपये झाले. तर २०२१-२२ च्या जानेवारी-मार्च कालावधीतील ७,२३७.४५ कोटी रुपयांच्या तुलनेत या तिमाहीत बुडीत कर्जे आणि आपत्कालीन परिस्थितींसाठी तरतूद जवळपास निम्मी होऊन ३,३१५.७१ कोटींवर आली आहे.

हेही वाचाः बाजारातील परदेशी वित्ताला घरघर; मार्च तिमाहीत गुंतवणुकीत ११ टक्क्यांनी घट

mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
Sonam Wangchuk
लेख: लडाखवासींची लोककेंद्री विकासासाठी हाक
loss firms donate electoral bonds
तोट्यात असणाऱ्या ३३ कंपन्यांकडून ५४२ कोटी रुपयांचे रोखे दान, एकट्या भाजपाला मिळाले तब्बल…

बँकेचे वैयक्तिक कर्ज वाटप १७.६ टक्क्यांनी वाढून ११.७९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्यामध्ये गृहकर्ज ६.४ कोटी रुपयांचे गृहकर्ज वाटप करण्यात आले आहे. स्टेट बँकेच्या कॉर्पोरेट कर्जाचे प्रमाण १२.५ टक्क्यांनी वाढून ९.७९ लाख कोटी रुपये झाले आहे. दरम्यान वार्षिक आधारावर ठेवींमध्ये ९.२ टक्के वाढ होऊन त्या ४४.२४ लाख कोटींवर पोहोचल्या आहेत.

हेही वाचाः विश्लेषण: हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने आता विकता येणं अवघड; सरकारने नियम बदलले, पुढे काय?

१,१३० टक्के लाभांश

स्टेट बँकेने ३१ मार्च २०२३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षासाठी १,१३० टक्के म्हणजेच प्रतिसमभाग ११.३० रुपये लाभांश जाहीर केला आहे. लाभांशाची देय तारीख १४ जून निश्चित करण्यात आली आहे. स्टेट बँकेचा समभाग गुरुवारच्या सत्रात २.११ टक्क्यांनी म्हणजेच १२.३५ रुपयांनी घसरून ५७४.१५ रुपयांवर बंद झाला.