LIC Group Post Retirement Medical Benefit Scheme: भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे नुकतीच एका नव्या निवृत्ती योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेमुळे कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर वैद्यकीय फायदे मिळावेत यासाठी त्यांची कर्तव्ये पूर्ण करण्यासाठी मदत होते. एलआयसीच्या नव्या निवृत्ती योजनेमधील प्रत्येक सदस्याला Fixed life insurance payout प्राप्त होते. ५० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेली कोणतीही कंपनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र असल्याची माहिती समोर आली आहे. २ मेपासून ही योजना प्रभावीपणे सुरु झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

LIC Group Post Retirement Medical Benefit Scheme चे फायदे

सेवानिवृत्तीच्या या योजनेअंतर्गत, कंपनीमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या परिवाराला विम्याची रक्कम दिली जाणार आहे. जर एखादी व्यक्ती नोकरी सोडते किंवा निवृत्ती घेते, तेव्हा योजनेच्या नियमांनुसार सेवानिवृत्तीनंतरचे वैद्यकीय फायदे दिले जातील. या योजनेच्या नियमांद्वारे ग्रुप पॉलिसी अकाउंटमधील निधीच्या उपलब्धतेच्या अधीन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुबांतील पात्र सदस्य निवृत्तीनंतरचे वैद्यकीय फायदे उपभोगू शकतात. याव्यतिरिक्त प्रत्येक सदस्याला Fixed life cover benefits देखील मिळते. योजनेमध्ये सहभागी असलेल्या कंपनी कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या फायद्यांमध्ये अधिकचे योगदान देऊ शकते.

आणखी वाचा – सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केंद्र सरकारद्वारे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ३-४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया विनिमय, २०१५ च्या नियमन ३० नुसार एलआयसीने २ मे २०२३ रोजी नवीन योजना लॉन्च करणार असल्याची घोषणा केली. ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अकरा ग्रुप उत्पादन आणि एक ग्रुप अ‍ॅक्सिडेंट बेनिफिट रायडरमध्ये जोडण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lic group post retirement medical benefit scheme know more about eligibility and benefits yps