भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India) ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. या कंपनीला एलआयसी असेही म्हटले जाते. १८१८ मध्ये भारतामध्ये ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी या पहिल्या विमा कंपनीची सुरुवात झाली.
पुढे साल १९५६ पर्यंत विमा सेवा आणि निधी सेवा पुरविणाऱ्या सुमारे २४५ भारतीय तसेच परकीय कंपन्या देशामध्ये अस्तित्त्वामध्ये होत्या. तेव्हा सरकारने त्यांना ताब्यात घेत त्यांचे राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९ जून १९५६ रोजी संसदेत एल आय सी कायदा संमत केला आणि १ सप्टेंबर १९५६ रोजी एलआयसीची स्थापना झाली. मुंबईमध्ये या कंपनीचे मुख्यालय आहे. सध्या भारतामध्ये २ लाखांपेक्षा जास्त एलआयसी एजंट्स कार्यरत आहेत.
कंपनीच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत जीवन विमा विभागामध्ये या संस्थेची मक्तेदारी आहे. २०२१ मध्ये एलआयसीद्वारे सुमारे ६,९३,९०४ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला. त्या वर्षामध्ये तब्बल २,९७४ कोटींचा नफा संस्थेला झाला. Read More
LIC Mutual Fund investment strategy: एलआयसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार झा यांनी बाजारातील अस्थिरतेच्या…
‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ अर्थात ‘एलआयसी’च्या केंद्र सरकारने राबवलेल्या आंशिक समभाग विक्रीला (ऑफर फॉर सेल – ओएसएस) मंगळवारी पहिल्याच दिवशी संस्थात्मक…
आयपीओ दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारात येण्यासाठी सज्ज होत असून या ऐतिहासिक महा-आयपीओच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळातील संस्थात्मक गुंतवणूकदारांना प्रचंड मोठा नफा कमावण्याची…
ज्या कंपनीतील वाटा ‘एलआयसी’ २०१६ पासून वाढवत नेते; त्याच कंपनीकडे खुद्द एलआयसीच्या म्युच्युअल फंडाने इतक्या वर्षांत ढुंकूनही पाहिले नाही. गुंतवणुकीसाठी…