India Loses Rs 60,000 Cr Every Year Due To Traffic Jams And Potholes: भारताला दरवर्षी वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे ६०,००० कोटी रुपयांहून अधिक नुकसान सहन करावे लागते. जे पाकिस्तानला तोंड देण्यासाठीच्या संरक्षण बजेटपेक्षा जास्त असल्याचा दावा, झिप्पीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव कस्तुरिया यांनी लिंक्डइनवरील एका पोस्टमध्ये केला आहे. या पोस्टमध्ये बेंगळुरूचा उल्लेख, शहरी अपयशाची केस स्टडी म्हणून करण्यात आला आहे.

“सरकार ‘स्मार्ट शहरे’ असे ट्विट करत राहिल. पण सत्य हे आहे की, आपण मूर्ख आहोत आणि रस्त्यांवर धावत आहोत”, असे कस्तुरिया यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यांनी भारतातील प्रमुख शहरांमधील वाहतूक विलंब, वाईट लॉजिस्टिक्स आणि कोसळलेल्या पायाभूत सुविधांमुळे भांडवल कसे वाया जाते याकडे लक्ष वेधले.

ब्लॅकबकचे सह-संस्थापक राजेश याबाजी यांनी नऊ वर्षांच्या असह्य प्रवासामुळे बेंगळुरूच्या आउटर रिंग रोडवरून कार्यालय हलवल्याचा उल्लेख करून, कस्तुरिया यांनी असा युक्तिवाद केला की, वाहतूक कोंडी आता व्यवसायांना थेट प्रमुख महानगरांमधून बाहेर ढकलत आहे. “हा म्हणजे व्यवसायच शहर सोडून जातोय”, असे त्यांनी नमूद केले.

बंगळुरू जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मंद शहर

आकडेवारीतून आणखी निराशाजनक चित्र समोर येत आहे. बेंगळुरू हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मंद शहर आहे, जिथे सरासरी वेग ३४ मिनिटांत १० किमी इतका आहे. मुंबई आणि दिल्लीमध्येही अशीच परिस्थिती आहे. याउलट, टोकियोत फक्त १२ मिनिटांत हेच अंतर पार केले जाते.

भारताचा सरासरी प्रवास एका दिशेने ५९ मिनिटे किंवा प्रति कामगार दररोज जवळजवळ २ तास इतका आहे. अंदाजे १०० दशलक्ष शहरी व्यावसायिकांमध्ये याचा गुणाकार करा आणि उत्पादकतेचे दरवर्षी हजारो कोटींमध्ये नुकसान होत असल्याचे लक्षात येईल.

मालवाहतुकीतील अकार्यक्षमता

कस्तुरिया फक्त प्रवासात येणाऱ्या अडचणींपुरतेच बोलले नाहीत, त्यांनी ते मालवाहतुकीतील अकार्यक्षमतेवरही टीका केली. “भारतीय ट्रक दर दिवशी सरासरी ३०० किमी धावतात. अमेरिकेत, हेच प्रम ८०० किमी आहे”, असे ते म्हणाले. वाहतुकीतील प्रत्येक अतिरिक्त तासामुळे अन्नापासून ते ई-कॉमर्सपर्यंत दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा खर्च वाढतो यावर त्यांनी भर दिला.

अयशस्वी पायाभूत सुविधा

कतुरिया यानी पोस्टच्या शेवटी इशार दिला की, बर्नआउट, नोकरी सोडणे आणि नोकरभरतीतील आव्हाने आता फक्त एचआरच्या समस्या राहिलेल्या नाहीत. त्या अयशस्वी पायाभूत सुविधांची लक्षणे आहेत. “शहरे करांमुळे स्टार्टअप्स गमावत नाहीत, तर लोक चांगल्या स्थितीत कामावर हजर राहू शकत नाहीत म्हणून ते गमावतात.”