Stock Market Crash 27 January : भारतीय शेअर बाजाराची गेल्या काही दिवसांपासून घसरण चालू आहे. आज (सोमवार, २७ जानेवारी) सकाळी शेअर बाजार उघडताच आपटला. बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टीने गुंतवणूकदारांना लाल रंगाचं निशाण दाखवलं आहे. बीएसई सेन्सेक्स बाजार उघडताच ४९०.०३ अकांनी घसरून ७५,७००.४३ अंकांवर स्थिरावला. तर, एनएसई निफ्टीची देखील २०० अंकांनी घसरण झाली असून निफ्टी २२,९२१.२० अंकांवर व्यवहार करत आहे. सकाळी ११ च्या सुमारास सेन्सेक्स आणखी ७०० अंकांनी घसरला. तर, निफ्टी एक टक्क्यापेक्षा खाली गेला आहे. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स २७१.१९ अंकांनी (०.३६ टक्के) वाढून ७६,४६१.६५ वर व्यवहार करत होता. तर, निफ्टी ५० १८३.२५ अंकांनी (०.७९ टक्के) घसरून २२,९०८.९५ वर व्यवहार करत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेन्सेक्सवर झोमॅटोचे समभाग ३ टक्क्यांनी घसरले. एचसीएल टेक, पॉवरग्रिड, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, अदाणी पोर्ट्स, रिलायन्स, इंडसइंड बँक, इन्फोसिस, टीसीएस, एचडीएफसी बँकेचे शेअर्स एक ते दोन टक्क्यांनी घसरले आहेत. निफ्टी आयटी निर्देशांक १.३ टक्के व निफ्टी मेटल निर्देशांक १.७ टक्क्यांनी घसरला आहे.

बाजार घसरण्याची कारणं काय?

जागतिक बाजारात संध्या मंदी आहे. त्यामुळेच आज सकाळी देशांतर्गत बाजार सेन्सेक्स व निफ्टीची घसरण झाली. याशिवाय परकीय भांडवल कमी झाल्याने भारतीय बाजारातील घसरणीत भर पडली. अनेक परदेशी भांडलवदार भारतीय बाजारातून त्यांचं भांडवल काढून घेत असल्याचा गुंतवणूकदारांना फटका बसला आहे. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी शुक्रवारी निव्वळ २,७५८ कोटी रुपयांचे समभाग विकले.

कमकुवत कॉर्पोरेट कमाई, अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणाबाबत अनिश्चितता आणि सातत्याने परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराची घसरण होत आहे. भारतीय शेअर बाजारातून परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून (एफपीआय) विक्री चालू आहे. दुसऱ्या बाजूला डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होत आहे. कमकुवत कॉर्पोरेर्ट कमाईचे संकेत ही बाजार कोसळण्यामागची प्रमुख कारणं आहे. यामुळेच जानेवारी महिन्यात आतापर्यंत एफपीआयने ७.४४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक काढून घेतली आहे. याचे शेअर बाजारावर गंभीर परिणाम होत आहेl. विश्लेषकांचंही तेच मत आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market crash today sensex falls 700 points nifty 50 down asc