सैन्यदलाच्या दंतचिकित्सा विभागात शॉर्ट सव्र्हिस कमिशनअंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी ५६ जागा-
अर्जदार वैद्यकीय विज्ञान क्षेत्रातील बीडीएस/ एमडीएस पात्रताधारक असावेत. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत व त्यांनी नॅशनल एलिजिबिलिटी-कम-एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच ‘नीट : २०१७’ ही पात्रता परीक्षा दिलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ एप्रिल २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाच्या दंतचिकित्सा विभागाची जाहिरात पहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.indianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने
वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०१७.
’ नॅशनल हेल्थ मिशनमध्ये स्टेट हेल्थ सोसायटी महाराष्ट्र- मुंबईअंतर्गत वाशीम, परभणी, सिंधुदुर्ग, नाशिक, जालना व रत्नागिरी येथे डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम को- ऑर्डिनेटरच्या ६ जागा.
अर्जदार वैद्यकशास्त्र विषयातील पदवीधर असावेत. विशेष पदव्युत्तर पात्रताधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. याशिवाय उमेदवारांना सार्वजनिक आरोग्य वा आरोग्य सेवाविषयक कामाचा कमीतकमी १ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३८ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नॅशनल हेल्थ मिशनची जाहिरात पहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज कमिशनर (फॅमिली वेल्फेअर) अॅण्ड डायरेक्टर, नॅशनल हेल्थ मिशन, आरोग्य भवन, तिसरा मजला, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल परिसर, पी. डीमेलो मार्ग, मुंबई- ४०० ००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १२ मे २०१७.
’ केंद्रीय अर्थ व राजस्व मंत्रालयात वैयक्तिक साहाय्यकांच्या ९ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ मार्च २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली अर्थ व राजस्व मंत्रालयाची जाहिरात पहावी अथवा मंत्रालयाच्या http://fiuindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मे २०१७.
’ सेंटर फॉर एअरबॉर्न सिस्टिम्स, बंगलोर येथे ज्युनिअर रिसर्च फेलोशिपच्या ५ जागा-
अर्जदार बीई/ बीटेक पदवीधर असावेत व त्यांनी जीएटीई/ एनईटी यांसारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी अथवा त्यांनी इंजिनीअरिंगमधील एमई/ एमटेक यांसारखी पदव्युत्तर पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २२ ते २८ एप्रिल २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली सेंटर फॉर एअरबॉर्न सिस्टिम्स, बंगलोरची जाहिरात पहावी अथवा सेंटरच्या http://www.drdo.gov.in// या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे
भरलेले अर्ज डायरेक्टर, सेंटर फॉर एअरबॉर्न सिस्टिम्स, सीएबीएस, डीआरडीओ- संरक्षण मंत्रालय, बेलूर, युमलूर पोस्ट, बंगलोर- ५६००३७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १२ मे २०१७
भारतीय वायुसेनेत बहुविध कर्मचाऱ्यांच्या ६ जागा-
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ एप्रिल २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुसेनेची जाहिरात पहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज स्टेशन कमांडर, एअरफोर्स स्टेशन, दरभंगा (बिहार) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १२ मे २०१७.