Premium

HSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा! पदवी प्रवेशाची पहिली मेरिट लिस्ट ‘या’ दिवशी लागणार

Degree College Admission Maharashtra: MSBSHSE HSC निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

12th Pass HSC students Important Update Mumbai University Admissions Merit List Timetable How To Pre register
HSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा! पदवी प्रवेशाची पहिली मेरिट लिस्ट 'या' दिवशी लागणार (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

MSBSHSE HSC निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १२ जूनपर्यंत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही स्वरूपात प्रवेश अर्ज आपल्याला भरता येणार आहे. कोणत्याही अभ्यासक्रमासाठी किंवा महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाची पूर्व- नोंदणी करणे बंधनकारक आहे, कारण हा नोंदणी क्रमांक मुंबई विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आपणही अद्याप ही नोंदणी केली नसल्यास वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पदवी प्रवेशाची मेरिट लिस्ट कधी लागणार? (Degree Admission Merit List Mumbai)

उद्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये गुणपत्रिका मिळणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश वेळापत्रकात असेही म्हटले आहे की पहिली गुणवत्ता यादी १९ जूनपर्यंत जाहीर केली जाईल आणि विद्यार्थ्यांना त्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी २७ जूनपर्यंत वेळ मिळेल. त्याचप्रमाणे, दुसरी गुणवत्ता यादी २८ जून रोजी जाहीर होईल आणि विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत त्यांची प्रवेश प्रक्रिया निश्चित करावी लागेल आणि तिसरी (अंतिम) गुणवत्ता यादी ६ जुलै रोजी जाहीर केली जाईल. त्याआधी इनहाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश संबंधित महाविद्यालयात होतील.

पदवी प्रवेश वेळापत्रक (FY Bcom, FYBA, FYBSC Admission Timetable)

दरम्यान, काही महाविद्यालये पदवी प्रवेशासाठी स्वत: च्या प्रवेश परीक्षा घेतात. यंदाच्या प्रवेशासाठी मिठीबाई कॉलेज आणि एनएम कॉलेजद्वारे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) चाही विचार केला जात आहे. तर सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात झेवियर्स एंट्रन्स टेस्ट (XET) घेतली जाईल आणि सेल्फ-फायनान्सिंग प्रोग्रामसाठी आयोजित जय हिंद कॉमन ऑनलाइन प्रवेश परीक्षा १५ जून रोजी घेतली जाईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 15:00 IST
Next Story
पदवीधारकांना गुप्तचर विभागात नोकरीची मोठी संधी! ‘या’ ७९७ पदांसाठी भरती सुरु, आजच करा अर्ज