AIESL Recruitment 2024 : एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध ‘तंत्रज्ञ’ या पदासाठी नोकरीची भरती करण्यात येणार आहे. एकूण किती रिक्त जागांवर ही भरती करण्यात येईल याची माहिती नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी जाणून घ्यावी. तसेच नोकरीचा अर्ज पाठवणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख या सर्व महत्त्वाच्या बाबींबद्दल माहिती पाहावी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

AIESL Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये खालीलप्रमाणे भरती करण्यात येईल –

विमान तंत्रज्ञ [Aircraft Technicians] या पदासाठी एकूण ७२ रिक्त पदांवर भरती करण्यात येईल.
ट्रेनी तंत्रज्ञ [Trainee Technicians] या पदासाठी एकूण २८ रिक्त पदांवर भरती करण्यात येईल.

अशा एकूण १०० रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.

AIESL Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

विमान तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एअरक्राफ्ट मेंटेनन्स क्षेत्रातील एएमई डिप्लोमा/प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
अथवा उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

ट्रेनी तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एअरक्राफ्ट मेंटेनन्स क्षेत्रातील एएमई डिप्लोमा/प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
अथवा उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : CDAC Recruitment 2024 : प्रगत संगणक विकास केंद्रांतर्गत होणार मोठी भरती! पाहा अर्जाची अंतिम तारीख

AIESL Recruitment 2024 : वेतन

विमान तंत्रज्ञ या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास २७,९४०/- रुपये वेतन देण्यात येईल.

ट्रेनी तंत्रज्ञ या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास दरमहा १५,०००/- रुपये वेतन देण्यात येईल.

AIESL Recruitment 2024 – एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अधिकृत वेबसाईट लिंक –
https://www.aiesl.in/Default.aspx

AIESL Recruitment 2024 – अधिसूचना –
https://www.aiesl.in/Doc/Careers/Advertisement-of-Trainee-AT-and-Aircraft-Technician-2024.pdf

AIESL Recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील नमूद केलेल्या कोणत्याही पदासाठी उमेदवारास नोकरीचा अर्ज करायचा असल्यास त्यांनी तो ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी नोकरीच्या अधिसूचनेमध्ये दिलेल्या लिंकचा वापर उमेदवारांनी करायचा आहे.
नोकरीचा अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना १०००/- रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहेत –
सामान्य/जनरल श्रेणीतील उमेदवारांसाठी ३५ वर्षे अशी वयोमर्यादा आहे.
ओबीसी [OBC] श्रेणीतील उमेदवारांसाठी ३८ वर्षे अशी वयोमर्यादा आहे.
एससी/एसटी [SC/ST] श्रेणीतील उमेदवारांसाठी ४० वर्षे अशी वयोमर्यादा आहे.

विमान किंवा ट्रेनी तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज अंतिम तारखेआधी पाठवणे अनिवार्य आहे.
अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २५ जून २०२४ अशी आहे.

वरील नोकरीसंबंधी उमेदवारास कोणतीही माहिती हवी असल्यास त्यांनी एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट लिंक आणि अधिसूचना वर नमूद केलेली आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aiesl recruitment 2024 ai engineering services limited is hiring how to apply check out dha