रोहिणी शाह

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील वर्षीपासून अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सर्व गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गांच्या परीक्षांचा पहिला टप्पा म्हणून सुरू झाली. या व त्यामागील गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षेमध्ये सामान्य विज्ञान या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण व त्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे या लेखामध्ये पाहू.

● प्रश्न १. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण —————-

(१) पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीनीकरण होते

(२) मूळे ऑक्सीजनपासून वंचित होतात

(३) पाण्यामुळे मूळावरील परजीवींची वाढ होते

(४) वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात

● प्रश्न २. खालील जोड्या जुळवा.

( a) पायथन मोलुरुस ( i) हिमोटॉक्सिक

( b) नाजा नाजा ( ii) अंध साप

( c) व्हायपर रस्सीली ( iii) न्यूरोटॉक्सिक

( d) टायफ्लोप्स ब्रामिनास ( iv) बिन विषारी

पर्यायी उत्तरे :

( a) ( b) ( c) ( d)

(१) ( iv) ( iii) ( i) ( ii)

(२) ( iii) ( iv) ( ii) ( i)

(३) ( i) ( ii) ( iv) ( iii)

(४) ( iii) ( i) ( ii) ( iv)

● प्रश्न ३. आंतरिक कीड म्हणजे काय?

(१) एखाद्या महिन्यात वारंवार येणारी

(२) एखाद्या प्रदेशात येणारी

(३) एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्षे असणारी

(४) एखाद्या प्रदेशात तीव्र स्वरूपात असणारी

हेही वाचा >>> Maharashtra SSC Result 2024: दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट; ‘या’ आठवड्यात कधी लागणार निकाल जाणून घ्या

● प्रश्न ४. आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे पाच किंगडम खालीलप्रमाणे

अ. प्रोटिस्टा, फंजाय, मॅमेलीया, अॅनेलीडा, प्लांटी

ब. मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, अॅनिमेलीया

क. प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, पोरीफेरा, अॅनिमेलीया

ड. मोनेरा, फंजाय, मॅमेलीया, प्लांटी, अॅनिमेलीया

वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?

(१) फक्त क (३) फक्त अ

(२) फक्त ब (४) फक्त ड

● प्रश्न ५. विद्याुतधारेने विद्याुतरोधकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते?

(१) विद्याुतरोधकातील विद्याुत धारेचा वर्ग

(२) विद्याुतरोधकातील विद्याुत धारेचा घन

(३) विद्याुतरोधकांतील विद्याुत धारेचे वर्गमूळ

(४) त्यातील विभवांतराचा वर्ग

● प्रश्न ६. सोलार सेलचे (सौर घट) कार्य ————— वर आधारित आहे.

(१) स्टार्क इफेक्ट (२) कुलोम्ब इफेक्ट

(३) झीमन इफेक्ट (४) फोटोवोल्टाईक इफेक्ट

● प्रश्न ७. मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि तीन चार दिवसांनी पुन्हा पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात ————————- हा विषारी पदार्थ दिसून येतो.

(१) इंटरफेरॉन (२) हिमोझॉईन

(३) हिरुडिन (४) कोलोस्ट्रम

हेही वाचा >>> डिझाइन रंग-अंतरंग : ‘डिझाइन’ करिअरसाठी १०वी नंतर कोणती शाखा घ्यावी?

● प्रश्न ८. कॉपरच्या जर्मन सिल्व्हर धातुमिश्रणात ————— असते.

(१) Cu, Zn, Ag

(२) Cu, Zn, Ni

(३) Cu, Ni, Ag

(४) Cu, Zn, Al

● प्रश्न ९. खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साइड ह्यामध्ये अभिक्रिया होऊन धूहार तयार होतो. ह्याच अन्योन्यक्रियेत हे दुय्यम उत्पाद असतात.

(१) फक्त ओझोन आणि अल्डिहाइड

(२) फक्त अल्डिहाइड आणि किटोन

(३) फक्त अल्डिहाइड, किटोन, परॉक्सिअॅसिल नायट्रेट

(४) ओझोन, अल्डिहाइड, किटोन, परॉक्सिअॅसिल नायट्रेट

वरील विश्लेषणाच्या आधारे पुढील मुद्दे लक्षात येतात.

बहुविधानी प्रश्नांचे प्रमाण कमी आहे. सरळसोट प्रश्नांचे पर्यायही लहान आहेत. थोडक्यात प्रश्नांची लांबी कमी आहे. पण नेमका मुद्दा माहीत असल्यावरच उत्तर देणे शक्य होईल इतकी काठिण्य पातळी आहे. त्यामुळे मूलभूत संकल्पना सनजून घेऊन अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.

सामान्य विज्ञान घटकासाठी एकूण १५ प्रश्न संख्या निश्चित आहे. यातील उपघटकनिहाय प्रश्नसंख्या पुढीलप्रमाणे आहे: भौतिकशास्त्र ३, रसायनशास्त्र ३, आरोग्यशास्त्र ३, प्राणीशास्त्र ३ आणि वनस्पतीशास्त्र-३ त्यामध्ये कृषी १

रसायनशास्त्रामध्ये अभिक्रिया विचारण्यात आलेल्या नाहीत. मूलभूत मुद्द्यांवर प्रश्न विचारलेले दिसून येतात.

भौतिकशास्त्रामध्येही मूलभूत संकल्पनांवर भर आहे आणि गणिते विचारण्यात आलेली नाहीत.

रोगाचे कारक, लक्षणे आणि उपचार, लसी यांवर आरोग्य घटकामध्ये भर आहे.

वनस्पती आणि प्राणिशास्त्रापैकी एकाबाबत वर्गीकरणाचा प्रश्न दरवर्षी समाविष्ट केलेला आहे. मूलभूत, पारंपरिक मुद्दे आणि त्यांचे उपयोजन अशा आयामांवर आधारीत प्रश्नांचा समावेश दरवर्षी करण्यात आलेला आहे. या घटकाची तयारी कशी करावी हे पुढील लेखामध्ये पाहू.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi zws 70