किरण सबनीस

आजच्या आधुनिक युगात डिझाइन क्षेत्र हे अनेक ज्ञानक्षेत्रांचा योग्य समन्वय साधत आहे. कोणतीही नवीन वस्तू (Product) किंवा सेवा ( Service) डिझाइन करत असताना डिझाइनर्सना तीन पैलूंचा सखोल विचार करायला लागतो – वापरकर्त्याच्या गरजा, अपेक्षा (User Needs & Aspirations), तांत्रिक उपलब्धता व शक्यता (Technology Feasibility) आणि व्यावसायिक व्यवहार्यता (Business Viability). याचाच अर्थ असा की डिझाइन क्षेत्राचा विज्ञान, कला आणि वाणिज्य या तीनही शाखांशी परस्परपूरक संबंध आहे. त्याचप्रमाणे डिझाइन संस्थांमध्ये घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांसाठी १० वी नंतर कोणत्याही विशिष्ठ शाखेची अट नाही. डिझाइन क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी या तिन्ही शाखांपैकी कोणतीही शाखा निवडता येते. भारतातील बहुतेक सर्व नामवंत डिझाइन संस्था उदाहरणार्थ, राष्ट्रीय अभिकल्प संस्थान ( NID), भारतीय प्रौद्याोगिकी संस्थान (IDC IIT Bombay), राष्ट्रीय फॅशन प्रौद्याोगिकी संस्थान ( NIFT) आणि इतर डिझाइन शिक्षण संस्था विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना डिझाइनच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना समान संधी देतात. त्यामुळे डिझाइन क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसमोर ११वी आणि १२वी च्या शिक्षणाच्या शाखेची निवड करण्याचे आव्हान किंवा प्रसंगी मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. अधिक खोलात गेल्यास संभ्रमाची खालील कारणे असल्याचे जाणवते.

CET announced registration schedule for 2024 25 Post Graduate Medical Course admissions
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीचे वेळापत्रक जाहीर
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Student Support Committee Pune  organization working for needy students
स्कॉलरशिप फेलोशिप: ‘विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे’; गरजू विद्यार्थ्यांचा पुण्यातला हक्काचा आधारवड
MahaPareshan Pimpri Chinchwad Bharti 2024
१०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी! महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे अंतर्गत २३ पदांची भरती, आजच अर्ज करा
Admission, Post Graduate Ayurveda, Homeopathy,
पदव्युत्तर आयुर्वेद, होमियोपॅथी आणि युनानी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
How to prepare for JEE Main 2025
JEE Main 2025 परीक्षेचा विद्यार्थ्यांनी घरबसल्या अभ्यास कसा करावा?
Extension of 15 days for students to submit SEBC and Non Criminal Certificate
एसईबीसी व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना १५ दिवसांची मुदतवाढ
Maharashtra Medical Council, Maharashtra Medical Council Introduces QR Codes, Combat Bogus Doctors, combat bogus doctors new technology of QR Codes, marathi news, Maharashtra news, doctors, loksatta news,
नागपूर: आरोग्य विद्यापीठाकडून डॉक्टरांना कौशल्य विकासासाठी ‘डीएचएफसी’सक्ती

प्रथम, सर्वसाधारणपणे डिझाइन क्षेत्र केवळ चित्रकला, सौंदर्यशास्त्र, रंगसंगती या विषयांशी निगडीत आहे असे अनेक विद्यार्थी व पालकांना वाटते. परंतु प्रत्यक्षात डिझाइन हा विषय संशोधन, उत्पादन, विपणन, तंत्रज्ञान,आदी विविध क्षेत्रांशी सुद्धा निगडित आहे. त्यामुळे केवळ कला शाखा पुरेशी नसून इतर शाखांचीही आवश्यकता भासते. मग नेमके काय करावे?

दुसरे, आपल्या मुलांना डिझाइन क्षेत्रात भविष्य आहे का याची चिंता पालकांना असते. त्यामुळे त्यांना इतर शाखांमध्येही डिझाइनच्या संधी शोधायच्या असतात. उदाहरणार्थ, प्रॉडक्ट डिझाइनसाठी विज्ञान शाखा उपयुक्त ठरेल का? यूजर एक्सपिरियंस ( UX) डिझाइनसाठी कला शाखा चांगली पर्याय ठरू शकेल? १० वी नंतरच्या शाखेचा आणि भविष्यातील डिझाइन करिअर यांचा कसा मेळ लावता येईल?

तिसरे, काही विद्यार्थ्याना डिझाइन आणि आर्किटेक्चर या दोन्ही पैकी नेमके कोणते करिअर निवडावे हे निश्चित करायला वेळ हवा असतो. आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेसाठी (NATA) विज्ञान शाखा अनिवार्य आहे, परंतु डिझाइन पदवी अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेचे विद्यार्थी पात्र होऊ शकतात. मग नेमके काय करावे?

हेही वाचा >>> शिक्षणाची संधी : रंगमंचीय उपक्रमात सहभागी होण्याची संधी

ही आणि अशी काही कारणे लक्षात घेता विद्यार्थ्याना आणि पालकांना विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखांमुळे, डिझाइन शिक्षणाच्या तयारीसाठी आणि भविष्यातील करियरसाठी होणाऱ्या फायद्यांचा आणि मर्यादांचा विचार करणे महत्त्वाचे ठरणार आहे. (सोबत दाखवलेला तक्ता पहावा)

१० वी नंतर उपलब्ध शाखा आणि डिझाइन प्रवेश परीक्षा यांच्यामधील साधर्म्य:

१० वी नंतरच्या शाखा आणि डिझाइनच्या भविष्यातील करिअर यांच्यातील परस्पर संबंध:

विद्यार्थ्याना जर डिझाइन मध्ये कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, याची काही प्रमाणात जरी स्पष्टता असली तरी त्याचा उपयोग त्यांना शाखा निवडताना होऊ शकतो.

विज्ञान शाखा: डिझाइन क्षेत्रातील प्रॉडक्ट डिझाइन, वाहन डिझाइन, यूजर एक्सपिरियंस ( User Experience) डिझाइन, अंतर्गत सजावट आणि गेम डिझाइन यांसारख्या क्षेत्रांसाठी विज्ञान शाखेचा आधार मजबूत असतो. कारण या क्षेत्रात तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि विश्लेषणात्मक कौशल्ये आवश्यक असतात.

कला शाखा: डिझाइन क्षेत्रातील ग्राफिक डिझाइन, फॅशन डिझाइन, अॅनिमेशन, एक्झिबिशन डिझाइन यांसारख्या क्षेत्रांसाठी उपयुक्त ठरते. कारण या शाखेत सौंदर्यशास्त्राचा अभ्यास केला जातो आणि कल्पनाशक्ती मुक्त वापर करणे गरजेचे असते.

वाणिज्य शाखा: डिझाइन क्षेत्रातील ब्रँड डिझाइन, डिझाइन मॅनेजमेंट, सिस्टम आणि सर्विस डिझाइन आणि रिटेल एक्सपिरियंस डिझाइन यांसारख्या क्षेत्रांसाठी वाणिज्य शाखेचा उपयोग होतो. कारण या शाखेत बाजारपेठेचे ज्ञान, बदलणारे ट्रेंडस आणि ग्राहकांची गरज समजण्यावर भर दिला जातो.

काही संस्थामध्ये नवीन शिक्षण प्रणालीच्या ( New Education Policy)आधारे विद्यार्थ्याना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. त्यामुळे विज्ञान, कला आणि वाणिज्य अशी विभागणीच केली जात नाही. हा डिझाइन शिक्षणाच्या दृष्टीने एक सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे. सारांश असा की, १० वी नंतर नेमकी कोणती शाखा निवडायची हा पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या आवड, कल आणि गुणांवर अवलंबून असलेला निर्णय आहे. डिझाइन क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणतीही शाखा अडथळा ठरत नाही. मात्र, प्रत्येक शाखेचे फायदे आणि मर्यादा आहेत त्यांचा विचार करणे गरजेचे आहे. डिझाइन क्षेत्राची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दैनिक वेळापत्रक व्यवस्थित करणे, नवनवीन प्रयोग करत राहणे आणि शैक्षणिक अभ्यासाबरोबर डिझाइन कौशल्ये विकसित करणे महत्त्वाचे आहे.