BCCI Recruitment 2024 : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डमध्ये (BCCI) नोकरी करण्याची इच्छा असणऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण बीसीसीआयने जनरल मॅनेजर पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. याबाबत बीसीसीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवर माहिती दिली आहे. पात्र उमेदवार २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. पण, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया जाणून घ्या.

बीसीसीआयच्या जनरल मॅनेजर पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असणार आहे.

शैक्षणिक पात्रता

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. याचबरोबर त्याने बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स किंवा डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे कमीत कमी १५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. जनरल मॅनेजर पदासाठी उमेदवाराकडे मार्केटिंगसंबंधित ज्ञान आवश्यक आहे.

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय कमीत कमी ५५ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

पगार किती?

रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या जनरल मॅनेजर पदावर निवड झालेल्या व्यक्तीला महिन्याला लाखोच्या घरात पगार मिळतो. मात्र, या पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नेमका किती पगार मिळेल, याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Read More Career News : Shiv Nadar Networth: नेटवर्थ 3 लाख कोटी, दररोज करतो पाच कोटींचे दान; दिल्लीचा ‘हा’ सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे तरी कोण?

कुठे आणि कसा करावा अर्ज?

बीसीसीआयच्या जनरल मॅनेजर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना बीसीसीआयच्या अधिकृत ईमेल आयडीवर आपला सीव्ही पाठवावा लागेल. या पदासाठी उमेदवारांना २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

बीसीसीआयच्या भरती प्रकियेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी http://www.bcci.tv या अधिकृत वेबसाइटवर जा.

बीसीसीआय भरती २०२४ अधिकृत जाहिरात

BCCI General Manager Marketing 2024 PDF

या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे

१) आधार कार्ड
२) पॅन कार्ड
३) पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट
४) डिप्लोमा सर्टिफिकेट
५) पासपोर्ट साईज फोटो