मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत परिचारिका पदाच्या एकूण ६५६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – भारतीय सैन्यात सामील व्हायचंय? BSF मध्ये आहे नोकरीची सुवर्णसंधी, ‘ही’ आहे अर्ज करायची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख?

महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यांतर्गत परिचारिका पदाच्या एकूण ६५२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२३ आहे. तसेच परिचारिका पदासाठी ३५ हजार ४०० प्रतिमहिना इतके वेतन मिळणार आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

अर्ज कसा करायचा?

परिचारिका पदासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी अर्जाचा नमुनादेखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. जाहिरातीतील विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रतींसह ‘वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय, वॉर्ड नं. ७, मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी (पश्चिम ) मुंबई ४०००११ या पत्त्यावर अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी पाठवणे अनिवार्य आहे.

विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार पदाच्या ४ जागा रिक्त

परिचारिकेबरोबरच आरोग्य खात्यांतर्गत क्षयरोग रुग्णालय येथे विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार आणि विशेषज्ञ डॉक्टर पदांच्या एकूण ४ जागा रिक्त आहेत. या जागांसाठीदेखील अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी पात्र उमेदावारांनी वैद्यकीय अधिक्षक क्षयरोग रुग्णालय यांचे कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मार्च २०२३ आहे.

हेही वाचा- आयकर विभागात अधिकारी व्हायचंय? मग आताच अर्ज करा, नोकरीची आहे सुवर्णसंधी

शैक्षणिक पात्रता?

विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार पदासाठी उमेदवाराकडे भूलशास्त्रामध्ये मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदव्युत्तर पदवी किंवा पदविका किंवा सुक्ष्मजीवशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी किंवा बालरोग शास्त्रातील MD, DNB, DCH पदवी असणे आवश्यक आहे. तर विशेषज्ञ डॉक्टर पदासाठी उमेदवारने हृदयरोग शास्त्रामध्ये मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदव्युत्तर पदवी, फेलोशिप प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. किंवा मज्जासंस्था शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी, फेलोशिप घेतली असणे किंवा त्वचारोग शास्त्रातील MD Dermatology पदवी प्राप्त केलेली असणे अनिवार्य आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc recruitment for 656 vacant post in health department spb