BMC Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. बीएमसीअंतर्गत रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मानव संसाधन समन्वयक (ह्युमन रिसोर्सेस कोऑर्डिनेटर) या पदाची रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती असणार आहे. तसेच अर्ज थेट https://www.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन सबमिट करायचा आहे. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज २४ फेब्रुवारी २०२४ पासून स्वीकारण्यास सुरुवात होईल. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२४ असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

BMC Bharti 2024: या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अर्ज पाठवण्याचा पत्ता याची माहिती सविस्तर पाहू.

पदसंख्या – ३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

नोकरीचे ठिकाण – मुंबई</p>

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे असावे.

हेही वाचा…इंजिनीयर उमेदवारांनो ही संधी सोडू नका! भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ‘या’ पदासाठी भरती; ४० हजारांपर्यंत मिळणार वेतन

अर्ज शुल्क –

खुला प्रवर्ग – १००० रुपये.
मागासवर्गीय प्रवर्ग – ९०० रुपये.

शैक्षणिक पात्रता :

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.
किंवा
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकीमधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.

पगार :

निवड झालेल्या उमेदवारांना २५,५०० ते ८१,१०० रुपये पगार असणार आहे.

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज दिलेल्या संबंधित लिंकवर सादर करावा. अर्जामध्ये सर्व आवश्यक गोष्टींची संपूर्ण माहिती द्या, नाही तर अर्ज नाकारले जातील. अशा प्रकारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brihanmumbai mahanagarpalika bharti for 38 human resource coordinator location for this recruitment is mumbai asp