Canara Bank Apprentice Recruitment 2024: बँकेत नोकरी करू पाहणारे किंवा रोजगाराच्या शोधात असणारे पदवीधर उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे बँकेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कॅनरा बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातेय. कॅनरा बँकेकडून ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आलीये. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल, कारण एकूण तीन हजार पदांसाठी ही भरती असणार आहे. तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल, तर तुम्ही कॅनरा बँकेत या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया २१ सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि ४ ऑक्टोबर २०२४ रोजी संपेल. पात्र उमेदवारांनी बँकेत शिकाऊ उमेदवारीसाठी अर्ज करण्यापूर्वी, http://www.nats.education.gov.in या ॲप्रेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. ॲप्रेंटिसशिप पोर्टलवर १००% पूर्ण प्रोफाइल असलेले उमेदवारच अर्ज करण्यास पात्र आहेत.

पात्रता निकष

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांच्याकडे भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पात्रतेच्या तारखेनुसार उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. म्हणजे, उमेदवारांचा जन्म ०१.९.१९९६ आणि ०१.०९.२००४ दरम्यान झालेला असावा.

निवड प्रक्रिया

अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी १२ वी आणि डिप्लोमा परीक्षेत मिळालेल्या गुण/टक्केवारीच्या आधारे उतरत्या क्रमाने राज्यानुसार तयार केली जाईल. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराने सादर केलेल्या माहितीच्या आधारेच गुणवत्ता यादी तयार केली जाईल. दस्तऐवज संकलन आणि दस्तऐवज पडताळणी प्रक्रियेदरम्यान स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाईल.

हेही वाचा >> IOCL Bharti 2024: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी; ५० हजारांपर्यंत मिळणार पगार

अर्ज फी

सर्व उमेदवारांसाठी अर्जाची फी ५०० /- आहे. SC/ST/PwBD श्रेणीतील उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे. डेबिट कार्ड (RuPay/ Visa/ MasterCard/ Maestro), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड्स किंवा मोबाइल वॉलेट वापरून पेमेंट केले जाऊ शकते. अधिक संबंधित तपशिलांसाठी उमेदवार कॅनरा बँकेची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.