कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे मॅनेजमेंट ट्रैनी आणि ज्युनिअर कमर्शिअल एक्सिक्युटीव्ह या पदांच्या काही जागांसाठीची भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरतीची माहिती जाहिरात क्रमांक DR/CCI/2023-24/ मध्ये देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॉटन कॉर्पोरेशन भरती २०२३ –

पदाचे नाव –

मॅनेजमेंट ट्रैनी (मार्केटिंग), मॅनेजमेंट ट्रैनी (अकाउंट्स), ज्युनिअर कमर्शिअल एक्सिक्युटीव्ह.

एकूण रिक्त पदे – ९३

शैक्षणिक पात्रता –

  • मॅनेजमेंट ट्रैनी (मार्केटिंग) – अग्रीकल्चर बिझिनेस मॅनेजमेंट मध्ये MBA किंवा अग्रीकल्चर समतुल्य MBA.
  • मॅनेजमेंट ट्रैनी (अकाउंट्स) – CA/ CMA/ MBA (फायनान्स)/ MMS/ M.Com किंवा समतुल्य.
  • ज्युनिअर कमर्शिअल एक्सिक्युटीव्ह – ५० % गुणांसह B.Sc अग्रीकल्चर (मागासवर्गीय: ४५% गुणांसह).

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – १८ ते ३० वर्षे.
  • मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
  • ओबीसी – ३ वर्षांची सूट.

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी/ EWS – १५०० रुपये.
  • मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD – ५०० रुपये.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.

हेही वाचा- मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! सहाय्यक कायदा अधिकारी पदासाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर माहिती

अधिकृत बेवसाईट – https://www.cotcorp.org.in/?AspxAutoDetectCookieSupport=1

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २४ जुलै २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ ऑगस्ट २०२३

भरतीसाठीची आवश्यक आणि सविस्तर माहितीसाठी या (https://drive.google.com/file/d/1XHIWVqdIfTbZbJXHrPS_7vVNdWTolhqi/view) लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cci bharti 2023 recruitment for vacancies under cotton corporation of india know who can apply jap