DFCCIL Recruitment 2023: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या संस्थेमध्ये लवकरच भरती होणार आहे. यानिमित्ताने सरकारी नोकरी मिळवायची इच्छा असलेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. उमेदवार डीएफसीसीआयएलच्या dfccil.com या अधिकृत वेबसाइटवर मेगाभरतीसंबंधित सर्व माहिती मिळवू शकतात. त्याशिवाय अर्ज देखील वेबसाइटवरुन मिळवू शकतात.
डीएफसीसीआयएलमध्ये एकूण ५३५ उमेदवारांची नियुक्त केली जाणार आहे. या संस्थेमध्ये ज्यूनिअर इंजिनीअरच्या ३५३ जागा आणि एक्झिकेटिव्ह, ज्यूनिअर एक्झिकेटिव्हच्या १८१ जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायची सुरुवात २० जून रोजी झाली आहे. तसेच उमेदवार १९ जून ही अर्ज करायची शेवटची तारीख आहे. त्यानंतर २६ ते ३० जून या कालावधीत अर्ज एडिट केले जातील. भरतीमध्ये दहावी, बारावी तसेच डिग्री, डिप्लोमा केलेले उमेदवार अर्ज करु शकतात. शैक्षणिक पात्रतेसह वयाची मर्यादा याबाबतची माहिती संस्थेच्या वेबसाइटवर उपलब्ध मिळवू शकता.
भरतीमधील निवड प्रक्रिया लिखित परीक्षा, संगणक आधारित परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यांमध्ये विभागण्यात आली आहे. अर्ज केल्यानंतर उमेदवारांची निवड सेलेक्शन परीक्षा द्यावी लागेल. सीबीटी फेज वन परीक्षा ऑगस्ट महिन्यात असेल. तर सीबीटी फेज टू परीक्षेचे आयोजन डिसेंबर महिन्यात केले जाईल.
ज्यूनिअर इंजिनीअरच्या जागेसाठी अर्ज करण्याचा असल्यास उमेदवारांना १००० रुपये शुल्क म्हणून भरावे लागतील. तसेच ३५३ जागा आणि एक्झिकेटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ९०० रुपये आणि ज्यूनिअर एक्झिकेटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ७०० रुपये आकारले जातील. एससी, एसटी, पीडब्लूडी या गटातील उमेदवारांना या जागांसाठी मोफत अर्ज करण्याची मुभा आहे.