प्रा रवींद्र कुलकर्णी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयीची चर्चा प्रत्येक वेळी सहभागी मंडळींच्या ज्ञानात भर घालत होती. प्रा. रमेश सरांनी मागच्या बैठकीपासून देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांत NEP-2020 च्या अंमलबजावणीविषयी माहिती देण्यास प्रारंभ केला होता. मागच्या वेळी त्यांनी आंध्र प्रदेशातील अंमलबजावणीविषयी सांगितलं होतं. नेहमीप्रमाणे प्रा. महेश सरांनी उत्सुकतेनं विचारलं, ‘‘सर, आज कोणत्या राज्याबद्दल आपण आम्हाला सांगणार आहात?’’
रमेश सर म्हणाले, ‘‘आज आपण गुजरात राज्याने तेथील उच्च शिक्षण संस्थांमध्ये NEP-2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जुलै २०२३ मध्ये गुजरात राज्य सरकारने जाहीर केलेल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ( S.O.P.) वर एक नजर टाकू या. ही नियमावली बनवत असताना संबंधितांनी त्यावर भरपूर मेहनत घेतली आहे. यामध्ये त्यांनी विविध अभ्यासक आणि शिक्षकांची मते, सूचना आणि मार्गदर्शन घेतलं आहे. या रडढ च्या नियमावलीमध्ये उत्कृष्ट सार्वजनिक शिक्षण, ऑनलाइन शिक्षण आणि ओपन डिस्टन्स लर्निंग (ODL), पायाभूत सुविधांची सुलभता आणि उपलब्धता यासह अनेक उपायांद्वारे वाढीव प्रवेश, समानता आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समावेश करण्याचा उद्देश आहे.
दि. २४ जानेवारी २०२३ रोजी लागू केलेल्या GR क्रमांक HRE/2022/111/ K-1 नुसार, राज्य स्तरावरील उच्च शिक्षण संस्थांमध्ये NEP-2020 लागू करण्यासाठी एक विशेष कृती दल समिती स्थापन करण्यात आली आहे. ही अंमलबजावणी एकूण तीन टप्प्यात आयोजित केली आहे. पहिल्या टप्प्यात, एका वर्षु,च्या कालावधीत, खालीलप्रमाणे महत्त्वाच्या उपक्रमांचा पाठपुरावा केला गेला आहे
हेही वाचा >>> यूपीएससी सूत्र : इथेनॉल उत्पादनावरील बंदी अन् निवडणूक आयुक्त नियुक्ती विधेयक २०२३, वाचा सविस्तर…
* सर्वत्र स्वीकारले जाईल अशा समान्य श्रेयांक आणि अभ्यासक्रम चौकटीचं निर्माण व स्वीकार, विविध अभ्यासक्रमांना जोडणारे बहुविद्याशाखीय जोड अभ्यासक्रम आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण
* NEP डॅशबोर्ड, शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट आणि आंतर-विद्यापीठ क्रेडिट हस्तांतरणासाठी यंत्रणेची निर्मिती
* अभ्यासक्रमांची निवड आणि शिक्षण आणि एकाधिक प्रवेश आणि निर्गमन प्रणालीचे रुपांतर यामध्ये लवचिकता
* अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग म्हणून भारतीय भाषांमधील अभ्यासक्रम आणि कङर द्वारे भारतीय ज्ञान प्रणालीचा प्रचार
* समावेशक शिक्षुता/ प्रशिक्षुता / प्रत्यक्ष कार्यानुभव (On Job Training) आणि त्याचबरोबर उच्च शिक्षण संस्था आणि उद्याोग यांच्या परस्पर सहकार्यातून संशोधन व विकास मंडळांची स्थापना
* डिजिटल नोडल सेंटरची स्थापना आणि ऑनलाईन व खुल्या दूरस्थ शैक्षणिक अब्यासक्रमांचा प्रारंभ
* मूल्यमापनात अनुरूप बदल
* प्राध्यापकांचे प्रशिक्षण, शैक्षणिक संशोधन, मान्यता आणि रँकिंगमधील उत्कृष्टता, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे कार्यालय आणि उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रियीकरण’’
प्रा. सुनील सरांनी रमेश सरांना विचारलं, ‘‘सर, गुजरातने अभ्यासक्रमांची रचना कशी केली आहे?’’
रमेश सर उत्तरले, ‘‘कोणत्याही UG कार्यक्रमांच्या अभ्यासक्रमांत (विज्ञान/ कला/ वाणिज्य/ आयटी/ व्यावसायिक अशा वेगवेगळ्या अभ्यासक्रमांत) मुख्य विषयांचे अभ्यासक्रम, उपविषयांचे अभ्यासक्रम, बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम, क्षमतावृद्धी अभ्यासक्रम, कौशल्य संवर्धन अभ्यासक्रम, मूल्यवर्धित अभ्यासक्रम – VAC मुख्य विषयांच्या निवडीबरोबरच त्यांची भाषाविषयक अभ्यासक्रम, कौशल्य अभ्यासक्रम, पर्यावरण शिक्षण, भारताची घडण समजून देणारे अभ्यासक्रम, डिजिटल आणि तंत्रज्ञानाधारित विविध उपाय, शारीर आरोग्य आणि निरोगीपणा, योग शिक्षण, क्रीडा आणि फिटनेस यावरील अभ्यासक्रमांशी जोड घातली गेली आहे.’’ सर सांगत होते, ‘‘गुजरातने अभ्यासक्रमाची रचना अशा प्रकारे केली गेली पाहिजे याविषयी काही सूत्रे दिली आहेत: विज्ञान-कला-वाणिज्य म्हणजेच ज्यांना STEM अभ्यासक्रम म्हणतात त्यांत परस्परपूरकता असायला हवी; अतिरिक्त अभ्यासक्रम, व्यावसायिक आणि शैक्षणिक घटकांमध्ये असमानता नसावं;. अशा फ्रेमवर्कद्वारे मार्गदर्शन केलेल्या शिकवण्याच्या पद्धतींमध्ये ट्यूटोरियल कार्याद्वारे समर्थित व्याख्याने समाविष्ट करावीत; व्यावहारिक आणि क्षेत्राधारित शिक्षण द्यावं; विहित पाठ्यपुस्तके आणि ई-लर्निंग संसाधने आणि इतर स्वयं-अभ्यास सामग्रीचा पुरेसा वापर करावा; प्रकल्पलेखन, ओपन-एंडेड प्रकल्प कार्य (यापैकी काही प्रकल्प हे समूहकृतीचे असावेत; ते सर्वसामान्य -जेनेरिक/ हस्तांतरणीय आणि विषय-विशिष्ट कौशल्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी डिझाइन केलेले क्रियाकलाप असू शकतात); प्रशिक्षुता/ प्रत्यक्ष कार्यानुभव आणि क्षेत्र भेटी यांच्या जोडीने औद्याोगिक संशोधने किंवा इतर संशोधन सुविधा असाव्यात.’’
हेही वाचा >>> UPSC-MPSC : भारतातील रेल्वे वाहतुकीचा विस्तार कसा? रेल्वेच्या विकासावर परिणाम करणारे घटक कोणते?
सुशील सरांनी विचारलं, ‘‘सर, ह्या अभ्यासक्रमांचे श्रेयांक कसे सुचवले गेले आहेत?’’
रमेश सर उत्तरले, ‘‘विद्यार्थी तीन किंवा चार वर्षांच्या वॅ पदवी कार्यक्रमासाठी अनुक्रमे ६८ किंवा ९२ क्रेडिट्सचे एकल विद्याशाखीय/ आंतर विद्याशाखीय स्वरूपाचे मुख्य विषय निवडू शकतात. उदाहरणार्थ, एकल विद्याशाखीय मुख्य विषय निवड करताना ते विषय वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र किंवा या तीन अभ्यासक्रमांचे (म्हणजेच लाईफ सायन्समधील विषयांचं) कॉम्बिनेशन असू शकतं. विद्यार्थी जर दुहेरी मुख्य विषयासह बॅचलर/ पदवी मिळवण्यासाठी तयारी करत असेल तर त्या अभ्यासक्रमात त्याने ३-वर्षांच्या किंवा ४-वर्षांच्या बॅचलर पदवीसाठी दुसऱ्या प्रमुख शाखेतील-विशिष्ट अभ्यासक्रमांमधून एकूण श्रेयांकांपैकी किमान ४० टक्के श्रेयांक म्हणजे ५३/७० श्रेयांक मिळवणे आवश्यक आहे. येथे, विद्यार्थी त्यांच्या स्वत:च्या आवडीनुसार दोन प्रमुख (मुख्य) विषयांची निवड करू शकतात. दुहेरी मुख्य अभ्यासक्रमांची निवड विद्यार्थी करू शकतात याचं मुख्य कारण म्हणजे दोन विषयांवर पकड असणे हे त्यांना नोकरीच्या बाजारपेठेत इतरांपेक्षा थोडं अधिकचं असं बळ देऊन जातं. याखेरीज, एका विद्याशाखेचा अभ्यास करण्यासाठी, विद्यार्थ्याला दुसऱ्या विषयाचे पूर्व ज्ञान असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी गणिताचे ज्ञान महत्त्वाचे आहे. ३-वर्षांच्या वॅ प्रोग्राममध्ये, मिळवल्या जाणाऱ्या क्रेडिट्सची एकूण संख्या १३२ आहे, किमान ५३ क्रेडिट्स असलेल्या गणिताच्या विद्यार्थ्याला दुहेरी मुख्य विषयातील ‘गणितासह अर्थशास्त्रात B.Sc’ ही पदवी दिली जाईल. त्याचप्रमाणे, ४-वर्षांच्या पदवीस्तरावरील अभ्यासक्रमामधील, विद्यार्थ्यांना मिळवाव्या लागणाऱ्या श्रेयांकांची एकूण संख्या १७६ आहे, किमान ७० क्रेडिट्स असलेल्या गणिताच्या विद्यार्थ्याला दुहेरी मुख्य विषयातील ‘गणितासह अर्थशास्त्रात B.Sc. संशोधनासह ऑनर्स किंवा ऑनर्स’ ही पदवी दिली जाईल.’’
अनुवाद : डॉ. नीतिन आरेकर
(उर्वरीत मजकूर पुढील अंकात)