● गेट ( GATE –ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग) परीक्षा आता बी.ए./ बी.कॉम./ बी.एस्सी. उत्तीर्ण उमेदवारांनासुद्धा देता येणार आहे.
नॅशनल को-ऑर्डिनेशन बोर्ड (एनसीबी-गेट), डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, भारत सरकार यांच्या वतीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ( IISc) बंगळुरू आणि बॉम्बे, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, मद्रास आणि रूरकी या सात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( IITs) संयुक्तपणे गेट ही राष्ट्रीय परीक्षा आयोजित करीत असतात.
गेट २०२६ या परीक्षेसाठी IIT गुवाहाटी ही आयोजक संस्था आहे. देशभरातील २३ IITs; ३१ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) आणि ४ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी (पुणे, बंगलोर, हैद्राबाद आणि भुवनेश्वर); IISc बंगलोर, ७ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ( IISERs) (पुणे, भोपाळ, मोहाली, तिरूपती, कलकत्ता, तिरूअनंतपुरम आणि बेरहामपूर) मधील मास्टर्स ( ME/ M. Tech.) आणि डॉक्टोरल ( Ph. D.) प्रोग्राम्स इन इंजिनीअरिंग / सायन्स /कॉमर्स/आर्ट्सच्या प्रवेशासाठी आणि/किंवा MoE आणि इतर गव्हर्नमेंट स्कॉलरशिप्स/असिस्टंटशिप्स मिळविण्यासाठी गेट पात्रता परीक्षा आहे.
AICTE मान्यता प्राप्त इन्टिटयूटस् आणि AICTE मान्यता प्राप्त युनिव्हसिटी डीपार्टमेंटस मधून ME. M. Tech., M. Arch, साठी गेट/ GPAT स्कोअर आधारित प्रवेश घेणा-या उमेदवारांना दरमहा रु.१२,४००/- ची पोस्ट ग्रॅज्युएट स्कॉलशिप (साधारणत २२ महिन्यांसाठी) दिली जाते.
व्हॅलिड गेट स्कोअर आधारित थेट Ph. D. साठी प्रवेश घेणा-या उमेदवारांना पहिल्या दोन वर्षी दरमहा रु.३७,०००/- आणि पुढील ३ वर्ष दरमहा रु.४२,०००/- भत्ता दिला जातो.
काही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्ज (PSUs) (जसे की एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया, भेल, ईसीआयएल, गेल, आयओसीएल, एनटीपीसी, ओएनजीसी इ.) इंजिनीअरिंग मॅनेजमेंट ट्रेनी पदांवरील भरतीसाठी आणि देशभरातील व परदेशातील अनेक विद्यापीठामधील उच्च शिक्षणासाठी गेट स्कोअर ग्राह्य धरला जातो.
केंद्र सरकारमधील ग्रुप-ए पदांवर सिनियर फिल्ड ऑफिसर (टेली), सिनियर रिसर्च ऑफिसर ( CRYPTO)/ S T भरती गेट स्कोअर आधारित केली जाते.
गेट २०२६ स्कोअर रिझल्ट जाहीर झाल्या दिवसापासून ३ वर्षेपर्यंत वैध असेल.
गेट २०२६ परीक्षा एकूण ३० विषयांसाठी आयोजित केली जाईल. (२०२६ पासून नवीन एनर्जी सायन्स ( XE- I) विषयाचा समावेश केला आहे.) २०२४ पासून डेटा सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( DA) या विषयाचा समावेश करण्यात आला आहे.
ह्युमॅनिटिज अँड सोशल सायन्स ( XH) या पेपरमध्ये पुढील विषयांची परीक्षा घेतली जाते. इंग्लिश, इकॉनॉमिक्स, लिंग्विस्टिक्स (भाषाशास्त्र), फिलॉसॉफी, सायकॉलॉजी, सोशिऑलॉजी.यापैकी कोणताही एक ऑप्शनल सबजेक्ट निवडता येतो.
IIT मद्रास, कानूपर, खरगपूर आणि बॉम्बेमध्ये ह्युमॅनिटिजमधील मास्टर्स अँड डॉक्टोरल प्रोग्राम्ससाठी प्रवेश दिले जातात.
गेट २०२६ परीक्षा दिनांक २, ७, ८, १४, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी (प्रत्येक दिवशी दोन सेशन्समध्ये) देशभरातील (झोनल सेंटर्समधील) शहरातील केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे.
गेट २०२६ साठी IIT बॉम्बे झोनमध्ये अहिल्यानगर (अहमदनगर), अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), बारामती, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई-ठाणे, पनवेल-रसायनी, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, वसई-पालघर, वर्धा, यवतमाळ, संगमनेर-लोणी, मडगाव, मापुसा, पणजी, सुरत, वडोदरा इ. ३७ केंद्रांचा समावेश आहे. (उमेदवारांनी आपल्या IIT Zone मधील ३ शहरांना परीक्षा केंद्र म्हणून पसंतीक्रम द्यावा).
गेट २०२६ साठी पुढील पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक – बी.ई./बी.टेक./बी.फार्म./बी.आर्च./बी.एम्सी. (रिसर्च)/ बी.एस्./फार्म.डी. (१० २ नंतर ६ वर्षांचा कोर्स)/एम.बी.बी.एस./एम्.एस्सी./एम.ए./एम.सी.ए./इंटिग्रेटेड एम्ई/एम.टेक./ बी.एस्सी./(बी.एस्सी अॅग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉटेस्ट्री)/बी.ए./बी.कॉम. उमेदवार सुध्दा पात्र आहेत (पदवीच्या तिसऱ्या किंवा त्यापुढील वर्षात शिकणारे उमेदवार गेट २०२६ साठी पात्र आहेत.)
BA/ BCom / B. SC पात्रताधारक जे IITs आणि IISc मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
गेट-२०२६ परीक्षेसाठी कोणतीही वयाची अट ठेवलेली नाही.
परीक्षा पद्धती – गेट २०२६ चे सर्व विषयांचे पेपर्स पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे असतील, ज्यात ( i) मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ( MCQ), ( ii) मल्टिपल सिलेक्ट क्वेश्चन ( MSQ) आणि ( iii) न्यूमरिकल अॅन्सर टाईप ( NAT) अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असेल.
उमेदवारांना दिलेल्या जोड विषयांतील यादीतून एक किंवा दोन विषय निवडता येतील.(दोन विषयांसाठी सुध्दा एकच फॉर्म भरावयाचा आहे).
वरील विषय वगळता इतर विषयांसाठी – जनरल अॅप्टिट्यूड (लॅग्वेज आणि अॅनालायटिकल स्क्ल्सि वर आधारित १० प्रश्न)- १५ गुण इंजिनीअरिंग मॅथेमॅटिक्स – १३ गुण विषयावरील प्रश्नांसाठी ७२ गुण, एकूण १०० गुण.
प्रत्येक पेपरसाठी १८० मिनिटांचा कालावधी असेल. प्रश्न १ किंवा २ गुणांसाठी असतील. MCQ type प्रश्नांच्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील. MSQ/ NAT type प्रश्नांच्या चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.
काही संस्थांमध्ये फक्त गेट-२०२६ च्या स्कोअरवर आधारित प्रवेश दिले जातील. काही संस्थांमध्ये प्रवेश गेट-२०२६ मधील कामगिरी (७० टक्के वेटेज) आणि अॅडमिशन टेस्ट/इंटरव्ह्यूमधील कामगिरीवर (३० टक्के वेटेज) देवून दिले जातील.
गेट ऑनलाइन प्रोसेसिंग सिस्टीम ( GOAPS) वेबसाईट https:// gate2026. iitg. ac. in/ वर ऑनलाईन अर्ज २८ सप्टेंबर २०२५ पर्यंत भरता येतील.
ऑनलाइन अर्जात काही बदल करावयाची असल्यास दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी करता येईल.
अॅडमिट कार्ड दि. २ जानेवारी २०२६ पासून https:// gate2026. iitg. ac. in/ या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील. गेट २०२५ परीक्षा दि. ७, ८, १४, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी (प्रत्येक दिवशी दोन सत्रांमध्ये) घेतली जाईल.