नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) येथे काही जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांसाठी ६४७ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२३ आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्जाची पद्धत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती २०२३

पदाचे नाव रिक्त पदे –

  • पदवीधर अप्रेंटिस – १८६
  • डिप्लोमा अप्रेंटिस – १११
  • ITI अप्रेंटिस – ३५०

एकूण रिक्त पदे – ६४७

शैक्षणिक पात्रता –

  • पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात पदवी.
  • डिप्लोमा अप्रेंटिस – संबंधित विषयात डिप्लोमा.
  • ITI अप्रेंटिस – संबंधित ट्रेड मध्ये ITI पास.

अर्ज फी – भरतीसाठी अर्ज करायला कोणतीही अर्ज फी नाही.

अधिकृत बेवसाईट – https://hal-india.co.in/

नोकरीचे ठिकाण – नाशिक.

हेही वाचा- उत्तर रेल्वेमध्ये ३२३ पदांसाठी निघाली भरती, २८ ऑगस्टपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात- ५ ऑगस्ट २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ ऑगस्ट २०२३

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणूण घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1HG55ZV3SqkMqrB5qhFVdBK03FSI809qJ/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.