इंडियन कोस्ट गार्ड म्हणजेच भारतीय तटरक्षक दलाने भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार भारतीय तटरक्षक दलात ‘असिस्टंट कमांडंट’ (Assistant Commandant) पदासाठी आजपासून भरती सुरू झाली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवार ‘असिस्टंट कमांडंट’ पदासाठी या अधिकृत वेबसाइटवर joinindiancoastguard.cdac.in ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Indian Coast Guard Recruitment 2024 : भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, रिक्त पदे आणि अर्ज शुल्क याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

रिक्त पदे आणि पदसंख्या :
‘असिस्टंट कमांडंट पदासाठी ७० रिक्त जागेसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जनरल ड्युटीसाठी (GD) ५० पदे आणि टेक्निकल (मेकॅनिकल), (इंजिनिअर/इलेक्ट्रिकल) यासाठी २० रिक्त पदे असणार आहेत.

शैक्षणिक पात्रता :

जनरल ड्युटी (GD) – उमेदवारांनी ६० टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली असावी.

टेक्निकल (मेकॅनिकल) – उमेदवारांनी ६० टक्के गुणांसह नेव्हल आर्किटेक्चर / मेकॅनिकल / मरीन / ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रीयल आणि प्रोडक्शन / मेटलर्जी / डिझाइन / एरोनॉटिकल / एरोस्पेस विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असावी.

टेक्निकल (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) – ६० टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी, इंजिनिरिंग पदवी प्राप्त केलेली असावी.

हेही वाचा…BOB Bharti 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; ‘या’ विविध पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जातील सर्व तपशील

वयोमर्यादा :

उमेदवारांचे वय २१ ते २५ वर्षे असावे.

निवड प्रक्रिया :

असिस्टंट कमांडंटची निवड उमेदवारांच्या गुणवत्तेवर आधारित असणार आहे. उमेदवारांची संगणकावर आधारित ऑनलाइन स्क्रीनिंग परीक्षा होईल. ही १०० गुणांची एमसीक्यू म्हणजे बहुप्रश्न पद्धतीची (MCQ) चाचणी परीक्षा असेल; ज्यामध्ये प्रत्येक बरोबर उत्तरासाठी चार गुण असणार आहेत.

अर्ज फी :

सर्व उमेदवारांना ३०० रुपये अर्ज फी असणार आहे. यामध्ये तुम्ही नेट बँकिंग वापरून किंवा रुपे / क्रेडिट/ डेबिट कार्ड/ यूपीआय या पर्यायांचा वापर करू शकता. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची तारीख :

ऑनलाइन अर्जाची सुरुवात – १९ फेब्रुवारी २०२४.
तर ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – मार्च ६ २०२४ असणार आहे. अशा प्रकारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian coast guard bharti 2024 for assistant commandant 70 posts apply from today know the details asp