न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड ( NIACL) (भारत सरकारचा उपक्रम), मुंबई. १७० अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स (जनरालिस्ट्स अँड स्पेशालिस्ट्स) (स्केल- I) पदांची भरती. (Advt. No. CORP. HRM/ AO/ 2024 dtd. 6th September 2024) रिक्त पदांचा तपशील – (एकूण पदांपैकी १५ टक्के पदे अजा, ७.५ टक्के पदे अज, २७ टक्के पदे इमाव, १० टक्के पदे ईडब्ल्यूएस्साठी राखीव)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

(१) अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (जनरालिस्ट) – १२० पदे (९ पदे दिव्यांग (कॅटेगरी HI – २, VI – २, OC – १, ID/ MD – ४) उमेदवारांसाठी राखीव.)

(२) AO (अकाऊंट्स) – ५० पदे (४ पदे दिव्यांग (कॅटेगरी HI – १, VI – १, OC – १, ID/ MD – १) साठी राखीव).

पद क्र. १ व २ साठी पात्रता : चार्टर्ड अकाऊंटंट (ICAI)/कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंटंट आणि पदवी/ पदव्युत्तर पदवी (कोणत्याही विषयातील) उत्तीर्ण. (अजा/ अज/ दिव्यांग – ५५ टक्के गुण) किंवा MBA (फिनान्स)/ PGDM (फिनान्स)/ एम.कॉम. उत्तीर्ण.

पात्रता परीक्षा :(दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा : (दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी) २१ ते ३० वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ सप्टेंबर १९९४ ते १ सप्टेंबर २००३ दरम्यानचा असावा.) (कमाल वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)

वेतन : अंदाजे दरमहा वेतन रु. ८८,०००/-.

हेही वाचा : कॅनरा बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल तीन हजार जागांसाठी भरती; पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज, जाणून घ्या अर्जप्रक्रिया

निवड पद्धती : फेज-१ प्रीलिमिनरी ऑनलाइन एक्झामिनेशन – (अंदाजे १३ ऑक्टोबर २०२४ रोजी) ऑब्जेक्टिव्ह टाईप १०० गुणांसाठी (इंग्लिश लँग्वेज – ३० गुण, रिझनिंग अॅबिलिटी – ३५ गुण, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – ३५ प्रश्न, प्रत्येकी वेळ २० मिनिटे, एकूण वेळ १ तास.)

फेज-२ मेन एक्झामिनेशन – (अंदाजे १७ नोव्हेंबर २०२४ रोजी) ऑब्जेक्टिव्ह टेस्ट २०० गुणांसाठी आणि डिस्क्रीप्टिव्ह टेस्ट ३० गुणांसाठी. दोन्ही टेस्ट ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील.

ऑब्जेक्टिव्ह टेस्ट : २०० गुण, वेळ २ तास ३० मिनिटे. (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (जनरालिस्ट) पदांसाठी) (रिझनिंग – ५० गुण, वेळ ४० मिनिटे; इंग्लिश लँग्वेज – ५० गुण, वेळ ४० मिनिटे; जनरल अवेअरनेस – ५० गुण, वेळ ३० मिनिटे; क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – ५० गुण, वेळ ४० मिनिटे)

अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्पेशालिस्ट पदांसाठी (रिझनिंग ४० गुण, वेळ ३० मिनिटे, इंग्लिश लँग्वेज – ४० गुण, ३० मिनिटे, जनरल अवेअरनेस – ४० गुण, २५ मिनिटे, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – ४० गुण, ३० मिनिटे, नॉलेज ऑफ स्पेशालिस्ट स्ट्रीम – ४० गुण, ३५ मिनिटे) डिस्क्रीप्टिव्ह टेस्टचा कालावधी ३० मिनिटे. गुण – ३०. टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज. (लेटर रायटींग – १० गुण, निबंध लेखन – २० गुण) ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपरमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.

फेज-३ इंटरव्ह्यू : मुख्य परीक्षेतून उमेदवार इंटरव्ह्यूसाठी शॉर्ट लिस्ट केले जातील.

अंतिम निवड : मुख्य परीक्षा लेखी ऑब्जेक्टिव्हसाठी ७५ गुणांचे वेटेज आणि इंटरव्ह्यूसाठी २५ गुणांचे वेटेज देऊन एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.

फेज-१ पूर्व परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे/ MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी.

फेज-२ मुख्य परीक्षेसाठी केंद्र : महाराष्ट्रातील मुंबई/ ठाणे/ नवी मुंबई/ MMR, पुणे.

ऑनलाइन प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग : अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग उमेदवारांना प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंगकरिता ऑनलाइन अर्ज करताना तशी नोंद करावी लागेल. प्रोबेशन कालावधी १ वर्षाचा असेल जो आणखी ६/६ महिन्यांसाठी २ वेळा वाढविला जाऊ शकतो.

अर्जाचे शुल्क : अजा/अज/दिव्यांग रु. १००/-, इतर उमेदवारांना रु. ८५०/-. उमेदवार फक्त एका डिसिप्लिनसाठी अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अॅप्लिकेशन रजिस्ट्रेशन http:// newindia. co. in या संकेतस्थळावर दि. १० सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०२४ दरम्यान करावेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity at new india assurance company limited css