Bank of Baroda Recruitment 2023: बॅंकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे बँक ऑफ बडोदाने काही जागांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत आयटी विभागातील ४२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार २९ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा या बाबतची माहिती जाणून घेऊया. बँक ऑफ बडोदा भरती २०२३ साठीची नोकरभरती आयटी विभागात करारपद्धतीनं केली जाणार असून याबाबतची माहिती बँकेनं अधिकृत सूचनेद्वारे दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बँक ऑफ बडोदा भरती २०२३-

एकूण जागा – ४२

हेही वाचा- इंडिया पोस्टमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मेल मोटर सेवा मुंबई येथे ‘या’ पदासाठी होणार भरती, मिळेल ‘इतका’ पगार

पदाचे नाव आणि जागा पुढीलप्रमाणे –

सीनिअर क्वालिटी असिस्टंट लीड २, क्वालिटी अ‍ॅश्युरन्स इंजिनिअर २, ज्युनिअर क्वालिटी अ‍ॅश्युरन्स इंजिनिअर २, सीनिअर डेव्हलपर-फुल स्टॅक जावा १४, डेव्हलपर-फुल स्टॅक जावा ६, डेव्हलपर-फुल स्टॅक डॉट नेट, जावा ६, सीनिअर डेव्हलपर-मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट २, डेव्हलपर-मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट ६, सीनिअर UI/UX डिझायनर १, UI/UX डिझायनर १.

वयोमर्यादा –

  • सीनिअर क्वालिटी असिस्टंट लीड या पदासाठी किमान २८ आणि कमाल 40 वर्षांची वयोमर्यादा आहे.
  • क्वालिटी अ‍ॅश्युरन्स इंजिनीअर पदासाठी किमान २५ वर्ष आणि कमाल ३५ वर्षांची वयोमर्यादा आहे.
  • ज्युनिअर क्वालिटी अ‍ॅश्युरन्स इंजिनिअर पदासाठी कमीतकमी 23 वर्षं तर जास्तीत जास्त वयोमर्यादा 30 वर्षं इतकी आहे.
  • सीनिअर डेव्हलपर-फुल स्टॅक जावा या पदासाठी उमेदवाराचं वय कमीतकमी २८ तर जास्तीत जास्त ४० वर्ष असावं.
  • डेव्हलपर-फुल स्टॅक जावा आणि डेव्हलपर-फुल स्टॅक डॉट नेट, जावा या पदांसाठी किमान २५ आणि कमाल ३५ वर्षांची वयोमर्यादा आहे.
  • सीनिअर डेव्हलपर-मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट या पदासाठी उमेदवाराचं कमीतकमी वय २८ तर जास्तीत जास्त ४० वर्षांपर्यंत असावं
  • डेव्हलपर-मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट पदांसाठी किमान २५ आणि कमाल ३५ वर्षांची वयोमर्यादा आहे.
  • सीनिअर UI/UX डिझायनर या पदासाठी उमेदवाराचं कमीतकमी वय २८ तर जास्तीत जास्त ४० वर्षांपर्यंत असावं
  • UI/UX डिझायनर या पदासाठी कमीतकमी २५ तर जास्तीतजास्त ३५ वर्षांपर्यंत असावं.

अनुभव –

हेही वाचा- NTPC Recruitment 2023: एनटीपीसीमध्ये असिस्टेंट पदासाठी होणार बंपर भरती, कोण करु शकते अर्ज? जाणून घ्या

सीनिअर क्वालिटी असिस्टंट लीड या पदासाठी ६ वर्षांचा अनुभव. त्यापैकी ३ वर्षांचा अनुभव प्रॉडक्ट किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये असावा.

क्वालिटी अ‍ॅश्युरन्स इंजिनिअर पदासाठी सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

ज्युनिअर क्वालिटी अ‍ॅश्युरन्स इंजिनिअर पदासाठी सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये १ वर्षाचा गरजेचा.

सीनिअर डेव्हलपर-फुल स्टॅक जावा या पदासाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये किमान ६वर्षांचा अनुभव.

डेव्हलपर-फुल स्टॅक जावा आणि डेव्हलपर-फुल स्टॅक डॉट नेट, जावा पदासाठी कमीतकमी ३ वर्षांचा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील अनुभव असावा.

सीनिअर डेव्हलपर-मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट पदासाठी अर्ज करताना उमेदवाराला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये किमान ६ वर्षांचा अनुभव असावा.

डेव्हलपर-मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट या पदासाठी किमान ३ वर्षांचा सॉफ्टवेअर टेस्टिंगचा अनुभव आवश्यक.

सीनिअर UI/UX डिझायनर व UI/UX डिझायनर या पदांसाठी UI/UX डिझायनर रोल्समधील किमान ६ वर्षांचा अनुभव.

शैक्षणिक पात्रता –

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.ई. किंवा बी.टेक.

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेटची तारीख – २० मे २०२३

या भरती संदर्भातील अधिकच्या माहितीसाठी उमेदवारांनी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट द्यावी.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity for engineers in bank of baroda recruitment 2023 for 41 posts jap