सुहास पाटील
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत १४ संवर्गातील एकूण २१०९ पदांची भरती. (जाहिरात क्र. ०१/२०२३)
(१) शिपाई (गट-ड) – ४१ पदे. मुंबई – १९ (अज – २, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – २, भज-ड – १, विमाप्र – १, इमाव – ४, आदुघ – २, खुला – ५); पुणे – ३ (भज-क – १, इमाव – १, आदुघ – १); नाशिक – ५ (अजा – १, अज – १, खुला – ३); नांदेड – ८ (अज – २, आदुघ – २, खुला – ४, अनाथ – १ पद राखीव, १ पद दिव्यांग कॅटेगरी अंध/ अल्पदृष्टीसाठी राखीव); अमरावती – २.
पात्रता : (दि. ६ नोव्हेंबर २०२३ रोजी) १० वी परीक्षा उत्तीर्ण.
(२) स्वच्छक (गट-ड) – ३२ पदे. (मुंबई) (अज – ६, विजा-अ – १, भज-क – ३, विमाप्र – १, इमाव – ८, आदुघ – ३, खुला – १०) (दिव्यांग उमेदवारांसाठी २ पदे राखीव B/ LV – १, D/ HH – १).
पात्रता : इयत्ता ७ वीमधून बढती दिलेली असावी.
(३) वाहन चालक (गट-क) – २ पदे. (नांदेड) (विजा-अ – १, खुला – १).
पात्रता : ( i) १० वी परीक्षा उत्तीर्ण. ( ii) हलके मोटर वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना. ( iii) किमान ३ वर्षांचा अनुभव.
(४) प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) – ५ पदे. मुंबई – १ (खुला); पुणे – १ (अजा); औरंगाबाद – २ (अज – १, खुला – १); नागपूर – १ (खुला).
पात्रता : रसायनशास्त्र प्रमुख विषय घेवून विज्ञान शाखेतील पदवी किंवा कृषी शाखेतील पदवी.
(५) वरिष्ठ लिपिक (गट-क) – २७ पदे. औरंगाबाद – १३ (अजा – १, अज – २, विजा-अ – २, भज-ब – १, इमाव – ३, आदुघ – २, खुला – २); नांदेड – १ (अज); नागपूर – १० (अजा – २, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – १, इमाव – ५); पुणे – २ (विजा-अ – १, खुला – १); नांदेड – १ पद (इमाव).
पात्रता : ( i) १० वी परीक्षा उत्तीर्ण. ( ii) पदवी (कोणतीही शाखा).
(६) स्वच्छता निरीक्षक (गट-क) – १ पद (अजा).
पात्रता : ( i) १० वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण. ( ii) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र. ( iii) स्वच्छता अभियांत्रिकी पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ( iv) वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेची कामे करून घेण्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव.
(७) सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट-क) – ९ पदे. (मुंबई) (अज – १, भज-ब – १, भज-क – १, इमाव – १, आदुघ – २, खुला – ३).
पात्रता : ( i) १० वी व १२ वी परीक्षा उत्तीर्ण. ( ii) वास्तुशास्त्राची पदवी.
(८) उद्यान पर्यवेक्षक (गट-क) – १२ पदे. (मुंबई) (अजा – २, अज – १, भज-ब – १, इमाव – २, आदुघ – १, खुला – ५).
पात्रता : ( i) कृषी किंवा उद्यान विद्या यातील पदवी. ( ii) संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव. (अनुभवा संबंधित प्रमाणपत्र आवश्यक)
(९) लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-ब) – (अराजपत्रित) २ पदे. नागपूर – १ (खुला); नांदेड – १ (खुला).
पात्रता : ( i) १० वी परीक्षा उत्तीर्ण. ( ii) लघुलेखनाचा वेग १०० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र. ( iii) इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि. या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
(१०) लघुलेखक (उच्च श्रेणी) (गट-ब) (अराजपत्रित) – ८ पदे. मुंबई – २ (विजा-अ – १, आदुघ – १); औरंगाबाद – १ (खुला); नांदेड – २ (अजा – १, खुला – १); नागपूर – १ (अजा); अमरावती – २ (खुला).
पात्रता : ( i) १० वी परीक्षा उत्तीर्ण. ( ii) लघुलेखनाचा वेग किमान १२० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र. ( iii) इंग्रजी टंकलेखनाचा ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखनाचा ३० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
(११) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) – १३७८ पदे (अजा – १४४, अज – १००, विजा-अ – ४१, भज-ब – ३३, भज-क – ५२, भज-ड – १६, विमाप्र – २३, इमाव – २३४, आदुघ – १३८, खुला – ५९७) (अनाथ उमेदवारांसाठी १४ पदे राखीव) (५५ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव (कॅटेगरी LV – १४, D/ Hh – १४, OH – १४, SLD/ MD – १३)).
पात्रता : ( i) १० वी परीक्षा उत्तीर्ण. ( ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक वर्ष मुदतीचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्टसमन (वास्तुशास्त्रीय आरेखक) पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक) पाठ्यक्रम उत्तीर्ण. ( iii) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/ पदवी/ पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवार पात्र आहेत.
(१२) कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट-ब) (अराजपत्रित) मुंबई – ५ पदे (अज – १, भज-ब – १, इमाव – १, आदुघ – १, खुला – १).
पात्रता : ( i) १० वी व १२ वी परीक्षा उत्तीर्ण. ( ii) वास्तुशास्त्राची पदवी. ( iii) काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर, नवी दिल्ली यांचे नोंदणीकृत सदस्य.
(१३) कनिष्ठ अभियंता (विद्याुत) – मुंबई – ५५ पदे (अजा – ७, अज – १, विजा-अ – १, भज-ब – १, भज-ड – २, विमाप्र – १, इमाव – १०, आदुघ – ६, खुला – २६) (अनाथ उमेदवारांसाठी १ पद राखीव) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी – OH – १, MD – १ साठी राखीव).
पात्रता : विद्युत अभियांत्रिकी किंवा ‘इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम’ आणि ‘इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स (पॉवर सिस्टीम)’ मधील ३ वर्षांची पदविका.
(१४) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब) (अराजपत्रित) – मुंबई – ५३२ पदे (अजा – ९१, अज – २२, विजा-अ – १९, भज-ब – १४, भज-क – ३, इमाव – १४३, आदुघ – ५३, खुला – १८७) (५ पदे अनाथ उमेदवारांसाठी राखीव) (२१ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी (कॅटेगरी LV – ५, D/ HH – ५, OH – ५, LD/ MD – ६) राखीव).
पात्रता : ३ वर्षं कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी किंवा सिव्हील अॅण्ड रुरल इंजिनीअरिंग किंवा सिव्हील इंजिनीअरिंग अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन, ट्रान्सपोर्टेशन इंजिनीअरिंग किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी किंवा सिव्हील अॅण्ड एन्व्हायरमेंटल इंजिनीअरिंगमधील पदविका उत्तीर्ण.
सर्व पदांसाठी उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्यांचेकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक.
वयोमर्यादा : (दि. ६ नोव्हेंबर २०२३ रोजी) खुला (अमागास) १८ ते ४० वर्षे; मागासवर्गीय/ अनाथ/ आदुघ/ खेळाडू/ दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त – १८ ते ४५ वर्षे; पदवीधर अंशकालीन – १८ ते ५५ वर्षे.
वेतन श्रेणी : पद क्र. १ शिपाई व पद क्र. २ स्वच्छक – एस -१ (१५,००० अधिक ४७,६००) अधिक महागाई भत्ता १ देय इतर भत्ते, अंदाजे वेतन दरमहा रु. २६,०००/-.
पद क्र. ३ वाहन चालक – एस -६ (१९,९०० अधिक ६३,२००) अंदाजे वेतन दरमहा रु. ३४,६००/-; पद क्र. ४ प्रयोगशाळा सहाय्यक – एस -७ (२१,७०० अधिक ६९,१००) अंदाजे वेतन दरमहा रु. ३९,०००/-.
पद क्र. ५ वरिष्ठ लिपिक, पद क्र. ६ स्वच्छता निरीक्षक, पद क्र. ११ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एस -८ (२५,५०० अधिक ८१,१००) अंदाजे वेतन दरमहा रु. ४५,७००/-.
पद क्र. ७ सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ – एस -१२ (३२,००० अधिक १,०१,६००) अंदाजे वेतन दरमहा रु. ५६,०००/-.
पद क्र. ८ उद्यान पर्यवेक्षक – एस -१३ (३५,४०० अधिक १,१२,४००) अंदाजे वेतन दरमहा रु. ६७,९००/-.
पद क्र. ९ लक्षुलेखक (निम्नश्रेणी), पद क्र. १२ कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, पद क्र. १३ कनिष्ठ अभियंता (विद्युत), पद क्र. १४ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) एस -१५ (४१,८०० अधिक १,३२,३००) अंदाजे वेतन दरमहा रु. ७३,०००/-.
पद क्र. १० लघुलेखक (उच्च श्रेणी) एस -१६ (४४,९०० अधिक १,४२,४००) अंदाजे वेतन दरमहा रु. ७८,५००/-.
निवड पद्धती : कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाइन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची परीक्षा. प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील.
पद क्र. १ शिपाई आणि पद क्र. २ स्वच्छक, पद क्र. ५ वरिष्ठ लिपिक पदांसाठी परीक्षेचा कालावधी ९० मिनिटे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकी २५ प्रश्न/ ५० गुण एकूण १०० प्रश्न २०० गुण.
पद क्र. ३ वाहन चालक, पद क्र. ९ लघुलेखक (निम्न श्रेणी) आणि पद क्र. १० (लघुलेखक (उच्च श्रेणी) परीक्षेचा कालावधी ४५ मिनिटे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकी १५ प्रश्न, एकूण ६० प्रश्न, १२० गुण. याशिवाय ८० गुणांसाठी व्यावसायिक चाचणी घेतली जाईल. एकूण २०० गुण.
पद क्र. ४ प्रयोगशाळा सहाय्यक – परीक्षेचा कालावधी ९० मिनिटे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकी १० प्रश्न, एकूण ४० प्रश्न, ८० गुण. तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित (भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ भूविज्ञान/ कृषी विषयक) प्रत्येकी १५ प्रश्न, एकूण ६० प्रश्न, १२० गुण. एकूण १ प्रश्न, २०० गुण.
पद क्र. ६ स्वच्छता निरीक्षक, पद क्र. ७ सहायक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, पद क्र. ८ उद्यान पर्यवेक्षक, पद क्र. ११ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पद क्र. १२ कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, पद क्र. १३ कनिष्ठ अभियंता (विद्याुत) आणि कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – परीक्षेचा कालावधी ९० मिनिटे. ( i) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी एकूण २५ प्रश्न ५० गुण. ( ii) तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित ७५ प्रश्न, गुण १५०, एकूण १०० प्रश्न २०० गुण.
ऑनलाईन परीक्षेत एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांचा गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यात येईल.
सर्व पदांसाठी मौखिक (मुलाखती) परीक्षा घेण्यात येणार नाहीत.
जिल्हा केंद्र निवड : अर्ज सादर करताना जिल्हा (परीक्षा) केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – रु. १,०००/-; मागासवर्गीय/ आदुघ/ अनाथ/दिव्यांग – रु. ९००/-. (माजी सैनिकांना फी माफ आहे.) ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क दि. ७ नोव्हेंबर २०२३ पर्यंत भरता येईल.
उमेदवारास एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक.
परीक्षेचा दिनांक व कालावधी https:// mahapwd. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. परीक्षा प्रवेशपत्र परीक्षेपूर्वी १० दिवस अगोदर https:// mahapwd. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाईल. ऑनलाइन अर्ज https:// mahapwd. gov. in या संकेतस्थळावर दि. ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत करावेत.
ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.