● रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड्स ( RRBs) (रेल्वे मंत्रालय, भारत सरकार), देशभरातील २१ रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड्समध्ये सेक्शन कंट्रोलर पदांवर भरती.

एकूण रिक्त पदे – ३६८. आरआरबीनिहाय आणि रेल्वे झोननुसार रिक्त पदांचा तपशील सेंट्रलाईज्ड एम्प्लॉयमेंट नोटीस ( CEN) No. ०४/२०२५ च्या Annexure- B मध्ये दिलेला आहे. RRB मुंबई अंतर्गत एकूण रिक्त पदे – ४४.

सेक्शन कंट्रोलर – एकूण ४४ पदे. सेंट्रल रेल्वे ( CR) – २४ (अजा – ३, अज – ३, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १०) (१ पद अपंग कॅटेगरी LD साठी आणि २ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).

पश्चिम रेल्वे ( WR) – १८ (अजा – ३, अज – २, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – २, खुला – ७) (१ पद अपंग कॅटेगरी LD साठी २ पदे माजी सैनिकांसाठी राखीव)

SCR – २ पदे (खुला) ( RRB अहमदाबाद ( WR) – १५ पदे).

पात्रता – पदवी उत्तीर्ण. दृष्टी – चष्म्याशिवाय – दूरची – ६/९, ६/९, जवळची – Sn ०.६, ०.६ कलर व्हिजन, बायनॉक्युलर व्हिजन, नाईट व्हिजन आणि मायोपिक व्हिजन टेस्ट उत्तीर्ण करणे आवश्यक.

वयोमर्यादा – (दि. १ जानेवारी २०२६ रोजी) २० ते ३३ वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे) (विधवा/घटस्फोटीत/कायद्याने विभक्त पुनर्विवाह न केलेल्या महिला – खुला – ३५/इमाव – ३८/ अजा/अज – ४० वर्षे; अपंग – १०/१३/१५ वर्षे).

हेही वाचा

निवड पद्धती – कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ( CBT), CBAT, कागदपत्र पडताळणी आणि वैद्याकीय तपासणी.

एकापेक्षा अधिक RRBs मध्ये अर्ज केल्यास सर्व अर्ज बाद ठरविले जातील. निवडलेल्या RRB मधील रिक्त पदांसाठी उमेदवारांनी आपला पसंतीक्रम ऑनलाइन अर्जात नोंदणे आवश्यक.

शंकासमाधानासाठी हेल्पलाईन फोन नं. ९५९२००११८८, ०१७२५६५३३३३; ई-मेल – rrb. help@csc. gov. in

उमेदवार ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी देशभरातील कॉमन सर्व्हिस सेंटर ( CSC) ची मदत घेवू शकतात. CSC ची यादी http://www.csc.gov.in या वेबसाईटवर ( https://findmycsc.nic.in/csc/) या लिंकवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी आपल्या पसंतीचे आरआरबी मंडळ निवडून त्या मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज १४ ऑक्टोबर २०२५ (२३.५९ वाजे)पर्यंत करावा. उदा. आरआरबी, मुंबई – www.rrbmumbai.gov.in; आरआरबी, अहमदाबाद – www.rrbahmedabad.gov.in.