पदाचे नाव – लोकल बँक ऑफिसर ( JMGS- I) ( LBO) – एकूण ४०० पदे.
रिक्त पदांचा तपशिल – स्थानिय भाषेवरील प्रभुत्व अनिवार्य. कंसात स्थानिय भाषा दिलेली आहे.
(१) तामिळनाडू (तमिळ) – २६० (२) ओरिसा (ओरिया) – १०
(३) महाराष्ट्र (मराठी) – ४५ (अजा – ७, अज – ३, इमाव – १२, ईडब्ल्यूएस – ५, खुला – १८) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी OC आणि ID साठी प्रत्येकी १ पद राखीव).
(४) गुजरात (गुजराती) ३० (५) प. बंगाल (बंगाली) ३४
(६) पंजाब (पंजाबी) २१
पात्रता – (दि. १ मे २०२५ रोजी) पदवी (कोणतीही शाखा).
वयोमर्यादा – (दि. १ मे २०२५ रोजी) २०३० वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे).
वेतन श्रेणी – असिस्टंट मॅनेजर (स्केल- क) (४८,४८० – ८५,९२०) मूळ वेतन रु. ४८,४८०/- अधिक डीए, एचआरए, सीसीए इ. नियमाप्रमाणे.
प्रोबेशन कालावधी – निवडलेल्या उमेदवारांना २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.
निवड पद्धती – ऑनलाइन परीक्षा, भाषा प्राविण्य चाचणी ( LPT) आणि पर्सोनल इंटरव्ह्यू.
ऑनलाइन परीक्षा – एकूण १४० प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप ४ सेक्शन्समध्ये विभागलेले एकूण २०० गुण, वेळ ३ तास.
(१) रिझनिंग अँड कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड – ३० प्रश्न, ६० गुण, वेळ ६० मिनिटे.
(२) जनरल/इकॉनॉमि/बँकिंगग अवेअरनेस – ४० प्रश्न, ४० गुण, वेळ ३० मिनिटे.
(३) डेटा अॅनालिसिस आणि इंटरप्रिटेशन – ३० प्रश्न, ६० गुण, वेळ ६० मिनिटे.
(४) इंग्लिश लँग्वेज – ४० प्रश्न, ४० गुण, वेळ ३० मिनिटे.
सेक्शनल कट ऑफ आरक्षित प्रवर्ग – ३० टक्के गुण, इतरांसाठी ३५ टक्के गुण.
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या ०.२५ गुण वजा केले जातील.
स्थानिय भाषा प्राविण्य चाचणी ( LPT) उमेदवारांना उत्तीर्ण करणे अनिवार्य. परंतु ज्या उमेदवारांनी १० वी/१२ वी परीक्षेत संबंधित स्थानिय भाषा अभ्यासली असेल, त्यांना LPT माफ आहे. ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना पर्सोनल इंटरह्यूकरिता बोलाविले जाईल. अंतिम निवड ऑनलाइन परीक्षा आणि इंटरह्यूमधील गुणांना योग्य वेटेज देवून गुणानुक्रमे केली जाईल.
अर्जाचे शुल्क – अजा/अज/दिव्यांग यांना अर्जाचे शुल्क माफ आहे. परंतु त्यांना रु. १७५/- इंटिमेशन चार्जेस भरावे लागतील. इतरांना रु. ८५०/-.
परीक्षा केंद्र – छ. संभाजी नगर, नागपूर, पुणे, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/ MMR, अमरावती, लातूर, नांदेड, जळगाव, धुळे, अकोला, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर.
ऑनलाइन अर्ज www. iob. in या संकेतस्थळावर दि. ३१ मे २०२५ पर्यंत करावेत.
अॅप्रेंटिस ट्रेनी पदे
● इलेक्ट्रॉनिक्स अँड रडार डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट ( LRDE), डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ( DRDO), संरक्षण मंत्रालय, बेंगलुरू – ५०० ०९३ मध्ये सन २०२५-२६ करिता टेक्निकल (व्होकेशनल) अॅप्रेंटिस ट्रेनी पदांची भरती.
एकूण रिक्त पदे – ३० रिक्त पदांचा तपशिल –
(१) COPA/डेटा एन्ट्री ऑपरेटर/ CH & NM/सॉफ्टवेअर टेस्टींग असिस्टंट – ५.
(२) इलेक्ट्रिशियन – ४.
(३) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – ३.
(४) ड्राफ्ट्समन मेकॅनिकल – २
(५) फिटर – ४.
(६) मशिनिस्ट/ CNC मशिनिंग टेक – ३.
(७) मेकॅनिक मोटर वेहिकल/मेकॅनिक डिझेल – ३.
(८) टर्नर – २.
(९) वेल्डर – २.