MSTC Limited Recruitment 2023: मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपनीमध्ये लवकरच भरतीला सुरुवात होणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. कंपनीच्या http://www.mstcindia.co.in या अधिकृत वेबसाइटवरुन उमेदवार अर्ज मिळवू शकतात. भरती आणि नोकरीसंबंधित सविस्तर माहितीदेखील वेबसाइटवर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला २७ मे रोजी सुरुवात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमएसटीसी लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी आणि असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तेथे एकूण ५२ जागा रिक्त आहेत. या जागांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला नुकतीच सुरुवात झाली आहे, तर ११ जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज केल्यानंतर उमेदवारांची कॉम्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येईल. भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा व अन्य नियम याबाबतची माहिती वेबसाइटवरुन मिळवू शकता.

MSTC Limited Recruitment 2023: अशा प्रकारे करा ऑनलाइन अर्ज :

  • www.mstcindia.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • Home Page वर Career टॅबवर क्लिक करा.
  • त्यानंतर Apply Link वर जाऊन क्लिक करा.
  • ऑनलाइन अर्जामध्ये माहिती भरा. त्यानंतर प्रवेश शुल्क भरा.
  • पुढे अर्ज सबमिट करा. अर्जाच्या प्रिंट्स काढून स्वत:कडे ठेवा.

आणखी वाचा – UPSC Recruitment 2023: असिस्टंट इंजिनिअरसह इतर पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख, पात्रता निकष

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ५०० रुपये प्रवेश शुल्क म्हणून भरावे लागतील. एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी या वर्गातील उमेदवार कोणत्याही प्रकारचे शुल्क न भरता अर्ज करु शकतात. भरतीबाबत अपडेट्स मिळवण्यासाठी मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाइट चेक करत रहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mstc limited recruitment 2023 metal scrap trade corporation limited recruitment drive apply for management trainee assistant manager posts 11 june is last date know more yps
First published on: 29-05-2023 at 10:02 IST